• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोल्हापूर : सेवा रुग्णालयात ‘DEIC’ आणि ‘RBSK’ अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा गौरव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
कोल्हापूर : सेवा रुग्णालयात ‘DEIC’ आणि ‘RBSK’ अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा गौरव
0
SHARES
44
VIEWS
Ad 1

कोल्हापूर | प्रतिनिधी

जिल्हा शल्य चिकित्सक अधिनस्त जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC) आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत सन २०२५-२६ या वर्षात शस्त्रक्रिया व आरोग्य सेवांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डॉक्टर, वैद्यकीय पथके आणि कर्मचाऱ्यांचा विशेष गौरव समारंभ कोल्हापूर येथील सेवा रुग्णालय, कसबा बावडा येथे संपन्न झाला. हा कार्यक्रम दि. ८ मे २०२६ रोजी पार पडला.

RelatedPosts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते संबंधित डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

तज्ञ डॉक्टरांचा सन्मान

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बाल शल्य चिकित्सक डॉ. शिवप्रसाद हिरुगडे, सर्जन डॉ. सुनील कुरुंदवाडे, कान-नाक-घसा तज्ञ डॉ. दिलीप वाडकर, भूलतज्ञ डॉ. सुश्रुत नाडकर्णी, डॉ. जयंता पाटील, डॉ. महेंद्र कुंभोजकर तसेच शल्य चिकित्सक डॉ. धीरज महाजन यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यासोबतच RBSK पथक क्रमांक १, २ व ३, DEIC चे अधिकारी व कर्मचारी, ऑपरेशन थिएटर (OT) स्टाफ, आंतररुग्ण विभाग तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (MJPJY) स्टाफ यांचाही गौरव करण्यात आला.

“गौरवामुळे कर्मचाऱ्यांना नवी ऊर्जा मिळते”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर मंडळाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने होते. मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, “उत्कृष्ट सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव केल्याने त्यांचे मनोबल वाढते आणि कामासाठी नवी ऊर्जा मिळते. अशा उपक्रमांमुळे जिल्ह्याच्या आरोग्य सेवेचा दर्जा अधिक उंचावण्यास मदत होते.”

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. नीलिमा पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

प्रगतीचा आढावा सादर

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन DEIC चे बालरोग तज्ञ डॉ. बाबासाहेब थोरात यांनी केले. त्यांनी DEIC विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या अत्याधुनिक सेवा-सुविधा आणि उपचार पद्धतींच्या प्रगतीचा आढावा सादर केला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रेश्मा पाटील, डॉ. गुणाजी नलवडे, प्रज्ञा संकपाळ, मनोरमा सुंजी तसेच सेवा रुग्णालयातील सर्व टीमने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता DEIC विभागाचे दंत शल्य चिकित्सक डॉ. सात्विक कुलकर्णी यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.

Previous Post

इमारत मी बांधतो, पण शाळा टिकवण्यासाठी मुले तुम्ही पाठवा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

Next Post

यशवाडी पाटीवर भीषण अपघात; एसटीच्या धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू

Related Posts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
58
कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
26
उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

September 28, 2026
10
घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी

September 28, 2026
5
ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक
ताज्या घडामोडी

ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक

September 28, 2026
23
नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी
ताज्या घडामोडी

नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी

September 28, 2026
156
Next Post
यशवाडी पाटीवर भीषण अपघात; एसटीच्या धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू

यशवाडी पाटीवर भीषण अपघात; एसटीच्या धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू

ताज्या बातम्या

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In