• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

यशवाडी पाटीवर भीषण अपघात; एसटीच्या धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
यशवाडी पाटीवर भीषण अपघात; एसटीच्या धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू
0
SHARES
27
VIEWS
Ad 1

परभणी प्रतिनिधी :

परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील कोल्हावाडी परिसरातील यशवाडी पाटी येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर शुक्रवारी दुपारी भीषण अपघात घडला. भरधाव एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

RelatedPosts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

मिळालेल्या माहितीनुसार, परभणीहून बीडकडे जाणारी एसटी बस (क्रमांक MH 14 BT 1561) दुपारी सुमारे २ वाजता रवाना झाली होती. बस चालक अप्पासाहेब मिसाळ हे वाहन चालवत होते. दरम्यान, परतूर तालुक्यातील खांडीवाडी येथील अनिलराव लक्ष्मणराव जाधव (वय ५५) आणि त्यांची पत्नी आशापती अनिलराव जाधव (वय ५०) हे यशवाडी येथील मारुती मंदिराचे दर्शन घेऊन आपल्या गावाकडे परतत होते.

दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास यशवाडी पाटी येथे मागून येणाऱ्या वेगवान एसटी बसने त्यांच्या दुचाकीला (क्रमांक MH 20 FE 7568) जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकी एसटीच्या खाली अडकून सुमारे ४०० ते ४५० फूट अंतरापर्यंत फरफटत गेली. या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर बस चालक अप्पासाहेब मिसाळ हा घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच मानवत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर, पोलीस निरीक्षक प्रमोद देवकते, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक किशन पतंगे, उपनिरीक्षक अनिल खिल्लारे व इतर पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने दोन्ही मृतदेह कोल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी हलवले असून, पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, महामार्गावरील वेगवान वाहनांवर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

कोल्हापूर : सेवा रुग्णालयात ‘DEIC’ आणि ‘RBSK’ अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा गौरव

Next Post

भारिप बहुजन महासंघाचे शाखा उपाध्यक्ष माणिकराव वाव्हळे यांचे निधन

Related Posts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
58
कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
26
उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

September 28, 2026
10
घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी

September 28, 2026
5
ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक
ताज्या घडामोडी

ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक

September 28, 2026
23
नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी
ताज्या घडामोडी

नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी

September 28, 2026
156
Next Post
भारिप बहुजन महासंघाचे शाखा उपाध्यक्ष माणिकराव वाव्हळे यांचे निधन

भारिप बहुजन महासंघाचे शाखा उपाध्यक्ष माणिकराव वाव्हळे यांचे निधन

ताज्या बातम्या

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In