• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

इमारत मी बांधतो, पण शाळा टिकवण्यासाठी मुले तुम्ही पाठवा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 10, 2026
in Blog
0
इमारत मी बांधतो, पण शाळा टिकवण्यासाठी मुले तुम्ही पाठवा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन
0
SHARES
110
VIEWS
Ad 1

पेरणोली केंद्रीय प्राथमिक शाळेचा शताब्दी महोत्सव दिमाखात संपन्न

आजरा

“ज्या शाळेत गुणवत्ता असते, तिथे पालक आपल्या पाल्याला शोधत येतात. पेरणोलीकरांचे विविध क्षेत्रांतील कार्य आदर्शवत आहे. शाळेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मी सुसज्ज नवीन इमारत बांधून देण्याची ग्वाही देतो. मात्र, केवळ देखणी इमारत उभी राहून चालणार नाही, ती टिकवण्यासाठी आणि मराठी शाळा वाचवण्यासाठी पालकांनी आपली मुले मराठी शाळेतच पाठविण्याची जबाबदारी स्वीकारावी,” असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

RelatedPosts

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

पेरणोली (ता. आजरा) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या शताब्दी महोत्सव व सन्मान सोहळ्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वनश्री देसाई होत्या.

“शिक्षण केवळ नोकरीसाठी नसावे” – प्रा. डॉ. नंदकुमार मोरे

प्रमुख वक्ते प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांनी शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करताना सांगितले की, “स्वातंत्र्यपूर्व काळात राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मुले शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना दंडाची तरतूद केली होती. आज पालकांनी सरकारवर दोषारोप करण्याऐवजी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. प्राथमिक शिक्षणात मूलभूत बदल होणे आवश्यक असून केवळ नोकरी मिळवणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर गाव आणि भूमीबद्दलचे भान जपणे हेच खऱ्या शिक्षणाचे यश आहे.”

मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्यास जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई, सभापती जयश्री गाडे, उपसभापती यशोदा पोवार, सहायक गटविकास अधिकारी दिनेश शेटे, नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी वनश्री देसाई व तानाजी देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच उपसरपंच संकेत सावंत, राजेंद्र सावंत, अविनाश जोशीलकर, पांडुरंग लोंढे, संतोष जाधव, रावसाहेब देसाई, मुख्याध्यापक एकनाथ पाटील, विजय सारंग, बसवराज गुरव आदी उपस्थित होते.

नियोजनबद्ध आणि उत्साहपूर्ण सोहळा

कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँ. संपत देसाई यांनी केले, तर संयोजन समितीचे अध्यक्ष उदयराज पवार यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन तानाजी पावले आणि संजय मोहीते यांनी केले. शेवटी उदय कोडक यांनी आभार मानले.

पेरणोली ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा शताब्दी महोत्सव अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला.

Previous Post

वेळ आणि पैसा यांची बचत व्हावी हेच शिबिराचे उद्दिष्ट – तहसीलदार अभय मस्के

Next Post

कोल्हापूर : सेवा रुग्णालयात ‘DEIC’ आणि ‘RBSK’ अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा गौरव

Related Posts

Blog

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
23
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!
Blog

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
14
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती
Blog

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026
3
आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले
Blog

आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले

September 28, 2026
1
घुंगराळ्याच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय झेप; ‘गोंधळ’ ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका
Blog

घुंगराळ्याच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय झेप; ‘गोंधळ’ ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका

September 28, 2026
2
Blog

लंच टाईम की ‘अनलिमिटेड’ टाईम? सरकारी कार्यालयांतील वेळेच्या शिस्तीवर प्रश्न

September 28, 2026
16
Next Post
कोल्हापूर : सेवा रुग्णालयात ‘DEIC’ आणि ‘RBSK’ अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा गौरव

कोल्हापूर : सेवा रुग्णालयात ‘DEIC’ आणि ‘RBSK’ अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा गौरव

ताज्या बातम्या

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In