• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अंबाजोगाई येथील ५०० बंदी क्षमतेच्या जिल्हा कारागृहाची अधिसूचना राजपत्रात झाली प्रसिद्ध

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
अंबाजोगाई येथील ५०० बंदी क्षमतेच्या जिल्हा कारागृहाची अधिसूचना राजपत्रात झाली प्रसिद्ध
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

आ. नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नांवर अंतिम शिक्कामोर्तब

अंबाजोगाई( प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे नवीन ‘जिल्हा कारागृह वर्ग-१’ स्थापन करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. बीड येथील एकमेव जिल्हा कारागृहावर वाढलेला ताण कमी करण्यासाठी आणि पोलीस प्रशासनाच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी या कारागृहाच्या मंजुरीसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, ज्याला आता यश आले असून ५ मे २०२६ रोजी यासंदर्भातील अधिसूचना राज्य राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

RelatedPosts

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

महाराष्ट्र कारागृह आणि सुधारसेवा अधिनियम २०२५ च्या कलम ३ आणि ४ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून राज्य सरकारने हे नवीन कारागृह घोषित केले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील मौजे काळवंटी, लमाण तांडा येथील सर्व्हे क्रमांक १/अ/५ मधील सुमारे ३० एकर क्षेत्रावर हे भव्य कारागृह साकारले जाणार आहे. या कारागृहाची एकूण क्षमता ५०० कैदी इतकी निश्चित करण्यात आली असून, यामुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला होणारा त्रास कमी होणार आहे. विशेषतः आरोपींना सुनावणीसाठी ने-आण करताना होणारी ओढाताण या निर्णयामुळे थांबणार आहे.

या नवीन कारागृहाच्या सीमा देखील निश्चित करण्यात आल्या असून, उत्तरेस व दक्षिणेस गायरान जमीन, पूर्वेस रस्ता आणि पश्चिमेस सर्व्हे क्रमांक १० अशी याची व्याप्ती असेल. राज्यपाल यांच्या आदेशानुसार सहसचिव सुग्रिव धपाटे यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे. आमदार नमिता मुंदडा यांनी या कारागृहासाठी आवश्यक असलेल्या ३० एकर जागेची उपलब्धता आणि प्रशासकीय मंजुरी मिळवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले होते. या निर्णयामुळे अंबाजोगाई परिसरातील पोलीस प्रशासनाच्या सोयीसह जिल्ह्याच्या कारागृह व्यवस्थेत मोठी सुधारणा होणार आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.

Previous Post

मांजरा धरणात केवळ ३२% पाणीसाठा; अंबाजोगाईसह केज, धारूरमध्ये पाणीसंकट गडद!

Next Post

श्री हनुमान विद्यालयाचा एसएससी निकाल ९३ टक्के; उज्ज्वल यशाची परंपरा कायम

Related Posts

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर
ताज्या घडामोडी

अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

August 6, 2026
7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
30
स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !
ताज्या घडामोडी

स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !

August 6, 2026
58
ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
13
Next Post
श्री हनुमान विद्यालयाचा एसएससी निकाल ९३ टक्के; उज्ज्वल यशाची परंपरा कायम

श्री हनुमान विद्यालयाचा एसएससी निकाल ९३ टक्के; उज्ज्वल यशाची परंपरा कायम

ताज्या बातम्या

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

August 8, 2026
शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

August 7, 2026
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

August 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In