पूज्य साने गुरुजी वरिष्ठ महाविद्यालयाचा नावलौकिक; बी.एस्सी. गणित परीक्षेत उल्लेखनीय यश
शहादा, दि. ८ : येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी प्रभात जयदेव सूर्यवंशी याने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बी.एस्सी. गणित विषयाच्या गुणवत्ता यादीत तृतीय स्थान पटकावून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे एप्रिल-मे २०२६ मध्ये विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेत प्रभात सूर्यवंशी याने बी.एस्सी. गणित विषयात उत्कृष्ट कामगिरी करत विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक मिळविला. त्याच्या या यशामुळे महाविद्यालयासह परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रभात याला महाविद्यालयातील गणित विभागप्रमुख डॉ. चंद्रशेखर सुतार, डॉ. गजानन पाटील, प्रा. जगदीश पाटील, प्रा. भाग्यश्री बोरदे आणि प्रा. कविता गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील, मानद सचिव सौ. जयश्रीताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंदभाई पाटील, संस्थेचे संचालक मयूरभाई पाटील आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. पटेल यांनी प्रभातचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.










