• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संघर्षाला ऐतिहासिक यश; ऊस उत्पादकांना ६११ रुपयांची वाढ!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संघर्षाला ऐतिहासिक यश; ऊस उत्पादकांना ६११ रुपयांची वाढ!
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

नंदुरबार आणि गुजरातच्या तापी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा प्रतिटन ३,४११ रुपये दर; सहा दिवसांच्या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय

शहादा, प्रतिनिधी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठी उभारण्यात आलेल्या तीव्र आंदोलनाला अखेर ऐतिहासिक यश मिळाले आहे. नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदा प्रतिटन ३,४११ रुपये दर मिळवून देण्यात आला आहे. मागील वर्षी मिळालेल्या २,८०० रुपये दराच्या तुलनेत यंदा तब्बल ६११ रुपयांची वाढ झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे.

RelatedPosts

भाऊ बहिणीचं नातं

दिवाळी व भाऊबीजेच्या खरेदीसाठी रिसोड बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी

श्रीगोंदा-मांडवगण रस्त्याच्या संथ कामाविरोधात १६ नोव्हेंबरला ठिय्या आंदोलन; प्रशासनाला इशारा

याबाबत अधिक माहिती अशी की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले होते. सलग सहा दिवसांच्या संघर्षानंतर आणि जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकांनंतर शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.

ऊस उत्पादकांसाठी महत्त्वाचे निर्णय

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताचे पुढील निर्णय घेण्यात आले आहेत.

१. ऊस तोडणीसाठी मुकादम किंवा सुपरवायझरला शेतकऱ्यांनी एक रुपयाही देऊ नये.

२. ऊस वाहतूक करणाऱ्यांना कोणताही अतिरिक्त भत्ता अथवा खुशाली देण्याची गरज नाही.

३. ऊस तोडणी करताना ऊस जाळून तोडणी केली जाणार नाही.

४. कारखान्याच्या वजनकाट्याबाबत शंका असल्यास शेतकऱ्यांना बाहेरून स्वतः वजन करून घेण्याची मुभा राहील.

५. ऊस तोडणीनंतर २१ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट देणे बंधनकारक राहील.

आंदोलनादरम्यान काही विघ्नसंतोषी व्यक्तींनी अफवा पसरवून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शेतकरी बांधवांनी एकजूट कायम ठेवत आंदोलन सुरूच ठेवले. अखेर सहा दिवसांच्या संघर्षानंतर शेतकऱ्यांच्या मागण्यांना यश मिळाले.

संघर्षात सहकार्य करणाऱ्यांचे मानले आभार

या आंदोलनात अशोक दशरथ पाटील, जगदीश मोहन पाटील, बापूसाहेब दीपकभाई पाटील आणि रामचंद्र दशरथ पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच गेल्या दहा दिवसांपासून आंदोलकांसाठी अन्नदान करणारे दानशूर व्यक्ती आणि चंद्रकांत उद्धव चौधरी (चंदूभाई), केदार सुरेश चौधरी, पुरुषोत्तम काशिनाथ पाटील, विजय पुरुषोत्तम पाटील, शशिकांत मोहन पाटील, दीपक सजन पाटील, अभय गोसावी, उमेश पाटील, हरी कृष्ण गोपाल पाटील, भरत पाटील, कैलास पाटील आणि शरदभाई पाटील यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

याशिवाय नर्मदा बचाव आंदोलन व संयुक्त किसान मोर्चाचे अध्यक्ष रामकृष्ण नारायण चौधरी आणि उपाध्यक्ष ओरसिंग टील्या पटले यांचेही मोलाचे योगदान लाभले.

शेतकरी एकजुटीचा विजय

हा विजय कोणत्याही एका व्यक्तीचा नसून तमाम शेतकरी बांधवांच्या एकजुटीचा, संघर्षाचा आणि सामूहिक ताकदीचा विजय असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लढा यापुढेही सुरूच राहील, असा निर्धार प्रदेशाध्यक्ष घनश्याम चौधरी, नंदुरबार जिल्हाध्यक्ष नथ्थू पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष पमन पाटील, जिल्हा सरचिटणीस आबालाल पाटील, उपाध्यक्ष वसंत पाटील यांच्यासह सर्व तालुका पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

या निर्णयामुळे नंदुरबार आणि तापी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकरी एकजुटीच्या ताकदीची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

Ad 1
Previous Post

भाऊ बहिणीचं नातं

Related Posts

भाऊ बहिणीचं नातं
ताज्या घडामोडी

भाऊ बहिणीचं नातं

November 10, 2026
0
दिवाळी व भाऊबीजेच्या खरेदीसाठी रिसोड बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी
ताज्या घडामोडी

दिवाळी व भाऊबीजेच्या खरेदीसाठी रिसोड बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी

November 10, 2026
7
श्रीगोंदा-मांडवगण रस्त्याच्या संथ कामाविरोधात १६ नोव्हेंबरला ठिय्या आंदोलन; प्रशासनाला इशारा
ताज्या घडामोडी

श्रीगोंदा-मांडवगण रस्त्याच्या संथ कामाविरोधात १६ नोव्हेंबरला ठिय्या आंदोलन; प्रशासनाला इशारा

November 10, 2026
30
दिवाळी बुक फेस्टिव्हल : ज्ञानाच्या प्रकाशाची चौदावी पर्वणी
ताज्या घडामोडी

दिवाळी बुक फेस्टिव्हल : ज्ञानाच्या प्रकाशाची चौदावी पर्वणी

November 10, 2026
11
प्रभात सूर्यवंशी याचे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत तृतीय स्थान
ताज्या घडामोडी

प्रभात सूर्यवंशी याचे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत तृतीय स्थान

November 10, 2026
6
वडमाळवाडीत रस्त्याची डागडुजी व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न!
ताज्या घडामोडी

वडमाळवाडीत रस्त्याची डागडुजी व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न!

November 10, 2026
20

ताज्या बातम्या

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संघर्षाला ऐतिहासिक यश; ऊस उत्पादकांना ६११ रुपयांची वाढ!

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संघर्षाला ऐतिहासिक यश; ऊस उत्पादकांना ६११ रुपयांची वाढ!

November 10, 2026
भाऊ बहिणीचं नातं

भाऊ बहिणीचं नातं

November 10, 2026
दिवाळी व भाऊबीजेच्या खरेदीसाठी रिसोड बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी

दिवाळी व भाऊबीजेच्या खरेदीसाठी रिसोड बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी

November 10, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In