दि. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी असलेल्या ‘ भाऊ बिज ‘ निमित्त साहित्यिक व कवी प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांची कविता वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.
भाऊ बहिणीचं नातं ।
अगदी छान असतं ॥
दोघांचेही जीव प्राण ।
गुंतले एकमेकात ॥
भाऊराया बहिणीचे ।
खास असे बालपण ॥
एकमेकात गुंतले ।
भाऊ बहिणीचे मन ॥
कधी चॉकलेटसाठी ।
खेळात जिंकण्यासाठी ॥
टीव्हीच्या रिमोटसाठी ।
बालपणीचे भांडणं ॥
भाऊ असे पाठीराखा ।
बहिणीचाच तो मान ॥
बहीण असे लाडकी ।
भावाचा ती अभिमान ॥
बहीण जाते सासरी ।
नयनी अश्रूंची गंगा ॥
भाऊंची बहिणीसाठी ।
घट्ट जीवनाचा धागा ॥
दूर असली बहीण ।
असे भाऊंच्या मनात ॥
गोड प्रेमळ नात्याला ।
तोड नाही या जगात ॥
राज्यस्तरीय संत कबीर
कवीराज पुरस्कार प्राप्त
कवी
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
अमरावती: ८०८७७४८६०९









