• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

स्टेअरिंग लॉक झाल्याने एसटी बस खड्ड्यात; दोघांचा मृत्यू, २० ते २५ प्रवासी जखमी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

पारगाव प्रतिनिधी –

आळेफाटा, दि. १७ : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील बेल्हा गावाजवळ रविवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. भिवंडी आगाराची शेवगाव-कल्याण-भिवंडी ही एसटी बस स्टेअरिंग लॉक झाल्याने नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्यालगतच्या खड्ड्यात कोसळली. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून २० ते २५ प्रवासी जखमी झाले आहेत.

RelatedPosts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

मृतांमध्ये बसचालक मोहम्मद एल. वाय. सलीम (वय ४५, रा. अमरावती) आणि प्रशांत साईनाथ होणशेटे (वय २७, रा. बेल्लर, जि. नांदेड) यांचा समावेश आहे. याबाबतची माहिती आळेफाटा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिली.

अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत बसच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढले. चालक मोहम्मद सलीम हे बसच्या केबिनमध्ये अडकले होते. त्यांना जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चालकासह काही प्रवाशांना ग्रामस्थांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमी प्रवाशांमध्ये कोंडीभाऊ वाकचौरे, कमल वाकचौरे, शंकर शेजाळ, वैशाली शेजाळ, मगन पाटोळे, शोभा पाटोळे, शारदा मेंगळे, अश्विनी बहिरट, अलका गायकवाड, अरुण गुंजाळ, दीपाली डोंगरे, उल्हास तांबे, यमुना यादव पावसे, दिव्या पवार, सिद्धेश नितीन काळे, आशा नितीन काळे आणि नितीन सिद्धार्थ काळे यांचा समावेश आहे.

या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेचा पुढील तपास आळेफाटा पोलीस करत आहेत.

Tags: Dipak Yewle
Previous Post

ओम मुळे यांच्याकडे सावरगांव केंद्राच्या केंद्रप्रमुख पदाचा अतिरिक्त कार्यभार

Next Post

जनगणना पूर्वतयारीला सेलू प्रशासनाचा वेग; नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करावे – तहसीलदार शकुंतला पाराजे

Related Posts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
177
ताज्या घडामोडी

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

August 15, 2026
28
ताज्या घडामोडी

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

August 15, 2026
86
शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
31
Next Post

जनगणना पूर्वतयारीला सेलू प्रशासनाचा वेग; नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करावे – तहसीलदार शकुंतला पाराजे

ताज्या बातम्या

सैनिक संघटनेचा अनोखा उपक्रम; विद्यार्थिनींकडून सीमेवरील सैनिकांना राख्या

August 20, 2026
संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In