• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जनगणना पूर्वतयारीला सेलू प्रशासनाचा वेग; नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करावे – तहसीलदार शकुंतला पाराजे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 18, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

सेलू प्रतिनिधी

भारत सरकारच्या जनगणना अधिनियम १९४८ अंतर्गत देशभरात राबविण्यात येणाऱ्या जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर सेलू तालुक्यात घरगुती गणनेच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार तालुक्यात घरगुती गणनेच्या कामास अधिकृत सुरुवात करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात दि. १५ मे ते २४ जून २०२६ या कालावधीत ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

तहसीलदार शकुंतला पाराजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील चिंचोली व गणेशपूर गावांमध्ये स्वगणना प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण झाली आहे. तसेच घोराड येथे घरगुती गणनेच्या कामाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. घोराड गावातील एचएलबी क्रमांक ००५९ अंतर्गत प्रगणक गणेश राठोड यांनी भव्याजी पांडुरंग राऊत यांच्या घरापासून गणनेला प्रारंभ केला.

या उपक्रमाचे उद्घाटन जनगणना कार्यालय मुंबईच्या संयुक्त संचालक कविता गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, जिल्हा जनगणना समन्वयक मुकेश गौडाणे, नायब तहसीलदार के. डी. किरसान, मंडळ अधिकारी लड़के, संबंधित पर्यवेक्षक, मंडळातील प्रगणक तसेच घोराडच्या माजी सरपंच ज्योती घंगारे आर्दी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सेलू तालुक्यात एकूण २५८ घरयादी गट (HLB) निश्चित करण्यात आले असून, त्यासाठी १४९ प्रगणक व २१ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जनगणना प्रक्रिया अचूक आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारी करण्यात आली आहे.

जनगणना कर्मचारी घराघरांत भेटी देणार असल्याने नागरिकांनी जातनिहाय व इतर आवश्यक माहिती अचूकपणे देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार शकुंतला पाराजे यांनी केले आहे.

Previous Post

स्टेअरिंग लॉक झाल्याने एसटी बस खड्ड्यात; दोघांचा मृत्यू, २० ते २५ प्रवासी जखमी

Next Post

राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार ॲड. विठ्ठलराव धोटे यांचे निधन

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
20
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
45
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
4
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
15
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
59
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
14
Next Post
राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार ॲड. विठ्ठलराव धोटे यांचे निधन

राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार ॲड. विठ्ठलराव धोटे यांचे निधन

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In