• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आश्वासन हवेतच; पष्टेपाड्यात ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी महिलांची वणवण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 22, 2026
in Blog
0
आश्वासन हवेतच; पष्टेपाड्यात ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी महिलांची वणवण
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

पष्टेपाडा येथे ग्रामपंचायतीच्या वतीने राबवण्यात आलेल्या पाणी योजनेचे काम पूर्ण होऊनही केवळ वीज मीटरअभावी नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ऐन उन्हाळ्यात महिलांना हंडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत असून ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

२६ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या ग्रामसभेत महिलांनी या गंभीर समस्येबाबत जाब विचारला होता. त्यावेळी ग्रामसभेच्या अध्यक्षा तथा सरपंच सौ. राजश्रीताई सातवी यांनी “मीटरचे पैसे भरले असून दोन दिवसांत मीटर बसवले जाईल,” असे आश्वासन दिले होते. मात्र, त्या आश्वासनाला तब्बल चार महिने उलटूनही अद्याप वीज मीटर बसवण्यात आलेले नाही.

RelatedPosts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

या पाणी योजनेमुळे पष्टेपाड्यातील सुमारे २० ते २५ कुटुंबांची तहान भागणार होती. योजनेचे तांत्रिक काम पूर्ण झाले असून केवळ वीज जोडणीअभावी पाण्याचा पंप सुरू होऊ शकलेला नाही. त्यामुळे घरातील लहान मुले, वृद्ध आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.

प्रजासत्ताक दिनी झालेल्या ग्रामसभेत महिलांनी आक्रमक भूमिका घेत पाणीपुरवठ्याचा प्रश्न लावून धरला होता. त्यावेळी दोन दिवसांत प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, चार महिन्यांनंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. ग्रामसभेसारख्या महत्त्वाच्या व्यासपीठावर दिलेल्या शब्दालाच केराची टोपली दाखवण्यात आल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.

दरम्यान, येत्या दोन दिवसांत वीज मीटर बसवून पाणीपुरवठा सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पष्टेपाड्यातील महिलांनी आणि ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.

Previous Post

माळवाडगाव येथील चंद्रकांत आढाव यांचे निधन

Next Post

चांभुर्डीत पाण्याचे ढिसाळ नियोजन; वाड्या-वस्त्यांवर हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण

Related Posts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
7
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
197
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
10
दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर
Blog

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

October 5, 2026
46
Next Post
चांभुर्डीत पाण्याचे ढिसाळ नियोजन; वाड्या-वस्त्यांवर हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण

चांभुर्डीत पाण्याचे ढिसाळ नियोजन; वाड्या-वस्त्यांवर हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In