• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उल्हासनगरात भररस्त्यात अंदाधुंद गोळीबार; दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, काका गंभीर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 22, 2026
in Blog
0
0
SHARES
32
VIEWS
Ad 1

उल्हासनगर : प्रतिनिधी

उल्हासनगर शहरातील कॅम्प ५ परिसरातील कैलाश कॉलनी चौकात गुरुवारी रात्री झालेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. जुन्या वादातून झालेल्या या हल्ल्यात दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे काका गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

अनिल चौहान (२२) आणि अमन चौहान (१७) या दोघांचा गोळीबारात मृत्यू झाला, तर अर्जुन सुरजबली चौहान हे गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती परिमंडळ ४ चे पोलीस उपआयुक्त सचिन गोरे यांनी दिली.

गुरुवारी सायंकाळी सुमारे आठच्या सुमारास कैलाश कॉलनी चौकात नागरिकांची नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू असताना ७ ते ८ जणांचे टोळके हत्यारांसह तेथे आले. काही समजण्याच्या आतच हल्लेखोरांनी चौहान कुटुंबीयांवर थेट गोळीबार सुरू केला. रस्त्यावर उघडपणे अनेक राऊंड फायर करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. गोळ्यांच्या आवाजाने नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावपळ केली.

प्राथमिक तपासात हा हल्ला अंबरनाथ गावातील एका कुख्यात गुंडा आणि कैलाश कॉलनीतील स्थानिक रहिवाशांमधील जुन्या वैमनस्यातून झाल्याचे समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हल्ल्यातील काही संशयित यापूर्वीही हत्येच्या गुन्ह्यात अडकले होते आणि सध्या जामिनावर बाहेर होते.

घटनेची माहिती मिळताच हिललाइन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी अर्जुन चौहान यांना तातडीने मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करून हल्लेखोरांच्या शोधासाठी चार विशेष पथके रवाना केली आहेत. या घटनेमुळे उल्हासनगरमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Previous Post

केळी विक्रेतांना मोकळीक तर भाजीपाला विक्रेत्या वर बसून कारवाईचा बडगा हा कसला न्याय?

Next Post

कळंबोलीत पूरस्थिती टाळण्यासाठी महापौरांकडून नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; कामांना गती देण्याचे आदेश*

Related Posts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
7
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
197
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
10
दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर
Blog

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

October 5, 2026
46
Next Post
कळंबोलीत पूरस्थिती टाळण्यासाठी महापौरांकडून नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; कामांना गती देण्याचे आदेश*

कळंबोलीत पूरस्थिती टाळण्यासाठी महापौरांकडून नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; कामांना गती देण्याचे आदेश*

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In