• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

युवा क्रांती फाउंडेशनचा चौथा वर्धापन दिन व ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 22, 2026
in Blog
0
युवा क्रांती फाउंडेशनचा चौथा वर्धापन दिन व ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

मुंबई : प्रतिनिधी

अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध कार्य करणाऱ्या युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत महाराष्ट्र पोलीस मित्र, ग्राहक संरक्षण, पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनांच्या वतीने आयोजित चौथा वर्धापन दिन आणि ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळा २१ मे २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

RelatedPosts

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

भव्य स्टेज सजावट, आकर्षक रोषणाई, संगीत, फटाक्यांची आतषबाजी आणि रंगीबेरंगी कागदी पताकांच्या वर्षावामुळे संपूर्ण सभागृह भारावून गेले होते. कार्यक्रमाच्या नियोजनाचे आणि शिस्तबद्ध व्यवस्थेचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले.

या सोहळ्यात राज्यभरातील विविध क्षेत्रातील १२१ मान्यवरांना “महाराष्ट्र भूषण पुरस्कार” प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरणावेळी करण्यात आलेली पुष्पवृष्टी आणि रंगीत कागदी तुकड्यांचा वर्षाव हा कार्यक्रमातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या युवा क्रांती महाराष्ट्र पोलीस मित्र संघटनेच्या हजारो महिला व पुरुष सदस्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला होता. सदस्यांच्या आकर्षक फेट्यांमुळे आणि शिस्तबद्ध उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिक खुलून दिसत होती.

उपस्थितांसाठी पुरी-भाजी, जिलेबी आणि थंडगार मठ्ठ्याच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. हेद्रे राजेश्वर यांनी प्रभावी शैलीत केले.

कार्यक्रमात विविध मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी यांच्या भाषणाने उपस्थितांना विशेष प्रेरणा मिळाली. समाजसेवा, न्याय आणि संघटन कार्याबाबत त्यांनी मांडलेले विचार उपस्थितांच्या मनाला भिडले. त्यांच्या भाषणादरम्यान सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले.

कार्यक्रमास संत-महंतांचीही उपस्थिती लाभली. त्यांनी युवा क्रांती महाराष्ट्र पोलीस मित्र संघटनेच्या समाजहिताच्या कार्याला आशीर्वाद देत कौतुक व्यक्त केले.

उत्कृष्ट फोटोग्राफी, व्हिडिओ चित्रीकरण आणि जल्लोषमय वातावरणामुळे हा सोहळा राज्यभर चर्चेचा विषय ठरला असून, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य आणि सहकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

पाटील डी. जी. सर आणि ए. पी. पगार सर, ज्येष्ठ राष्ट्रीय मार्गदर्शक, युवा क्रांती महाराष्ट्र पोलीस मित्र यांनी कार्यक्रमाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले.

Previous Post

अलिबाग मधील काशीद समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकाचा जीव वाचवण्यात प्रशासनाला यश

Next Post

सोशल मीडियावर ‘कॉकरोज जनता पार्टी’चा झंझावात; तरुण वर्गाचा वाढता प्रतिसाद

Related Posts

Blog

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026
18
Blog

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026
9
Blog

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

August 20, 2026
9
Blog

तांभा जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद मडावी यांची बिनविरोध निवड

August 20, 2026
24
Blog

सैनिक संघटनेचा अनोखा उपक्रम; विद्यार्थिनींकडून सीमेवरील सैनिकांना राख्या

August 20, 2026
23
संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
8
Next Post
सोशल मीडियावर ‘कॉकरोज जनता पार्टी’चा झंझावात; तरुण वर्गाचा वाढता प्रतिसाद

सोशल मीडियावर ‘कॉकरोज जनता पार्टी’चा झंझावात; तरुण वर्गाचा वाढता प्रतिसाद

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In