• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माहूरच्या सुपुत्राची नागपुरात वैदिक परंपरेला नवी दिशा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
माहूरच्या सुपुत्राची नागपुरात वैदिक परंपरेला नवी दिशा
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

प्राचार्य प्रवीण लिगदे यांच्या कार्याचा गौरव; ‘वेद भवन’ लोकार्पण व अष्टविकृती ग्रंथांचे प्रकाशन

श्रीक्षेत्र माहूर | प्रतिनिधी

भारतीय संस्कृतीचे मूळ वेदांमध्ये असून वेदांचे संरक्षण हेच राष्ट्र आणि मानवतेचे संरक्षण असल्याचे प्रतिपादन अयोध्या येथील गोविंददेव गिरी महाराज यांनी केले. नागपूर येथील वैदिक अनुसंधान केंद्रातर्फे घोगली-पिपळा परिसरात उभारण्यात आलेल्या नव्या ‘वेद भवन’ इमारतीचे लोकार्पण तसेच श्रीशुक्लयजुर्वेद काण्व शाखेतील जटा, माला, शिखा व घनपाठ पूर्वभाग या चार अष्टविकृती ग्रंथांच्या प्रकाशनाचा सोहळा उत्साहात पार पडला.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे ज्येष्ठ प्रचारक सुरेश सोनी प्रमुख उपस्थित होते. यावेळी वेदमूर्ती श्रीकृष्ण पुराणिक, प्रा. विरुपाक्ष जड्डीपाल, वीरराघव घनपाठी, शांताराम भानुसे, कुमारगुरू घनपाठी, वेदमूर्ती प्रशांत जोशी, विशाल कुळकर्णी, डॉ. विजयकुमार पट्टजोशी, राधा जोशी यांच्यासह अनेक वैदिक अभ्यासक आणि वेदप्रेमी उपस्थित होते.

यावेळी बोलताना गोविंददेव गिरी महाराज म्हणाले, “भारताने अनादिकाळापासून संपूर्ण जगाला आध्यात्मिक दिशा दिली आहे. वेद हे ईश्वरस्वरूप असून मानवकल्याणाचा पाया आहेत. वेदांचे अध्ययन हीच राष्ट्रसेवा आणि ईश्वरसेवा आहे.” युवकांनी वेद आणि भगवद्गीता यांचा अभ्यास करून धर्मरक्षणासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

सुरेश सोनी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, हजारो वर्षांचा कालखंड उलटूनही वेद अविकृत राहिले आहेत. अष्टविकृती परंपरेमुळे वेदांचे मूळ स्वरूप जपले गेले असून नव्या पिढीने ही परंपरा पुढे नेण्याची गरज आहे.

या संपूर्ण उपक्रमात विशेष आकर्षण ठरले ते वैदिक अनुसंधान केंद्राचे प्रधानाचार्य प्रवीण लिगदे यांचे कार्य. नांदेड जिल्ह्यातील पवित्र श्रीक्षेत्र माहूर येथील रहिवासी असलेल्या प्रवीण लिगदे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बालपणापासून वेदांचा कठोर अभ्यास केला. संघर्षमय जीवनातून त्यांनी वैदिक शिक्षणाची अखंड साधना करत नागपूरसारख्या शहरात वेद विद्यालय उभे केले आहे.

केवळ वेदाध्ययनच नव्हे, तर दुर्मीळ आणि लुप्तप्राय अष्टविकृती ग्रंथांचे जतन व पुनरुज्जीवन करण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी वैदिक शिक्षण घेत असून भारतीय संस्कृतीच्या जतनासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. वैदिक परंपरेच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेली अलौकिक ग्रंथरचना आणि संशोधनकार्य यामुळे त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

कार्यक्रमात अष्टविकृती ग्रंथांचे विधिवत लोकार्पण करण्यात आले. प्रास्ताविक राजेश मराठे यांनी केले. तसेच वेद भवन उभारणीसाठी सहकार्य करणाऱ्या आणि विविध प्रकारे सेवा देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. वैदिक संस्कृतीच्या जतनासाठी झालेला हा सोहळा नागपूरच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरला.

Tags: Kundan Tivadkar
Previous Post

गडचिरोली-उमरखेड एसटी बसचा भीषण अपघात; २५ ते ३० प्रवासी जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

Next Post

उत्रोलीजवळ दुचाकीवर वीज कोसळून तरुणाचा जागीच मृत्यू

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
4
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
92
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
36
Next Post
उत्रोलीजवळ दुचाकीवर वीज कोसळून तरुणाचा जागीच मृत्यू

उत्रोलीजवळ दुचाकीवर वीज कोसळून तरुणाचा जागीच मृत्यू

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In