• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सय्यद रायडर्स सिरसाळा संघाने पटकावली वनहाफ क्रिकेट स्पर्धेची ट्रॉफी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 21, 2026
in ताज्या घडामोडी
0
सय्यद रायडर्स सिरसाळा संघाने पटकावली वनहाफ क्रिकेट स्पर्धेची ट्रॉफी
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

अंतिम सामन्यात एकता क्रिकेट क्लब दिंद्रुडचा ८ विकेटने पराभव; ५१ हजारांचे पारितोषिक

दिंद्रुड | प्रतिनिधी : जय श्रीराम क्रिकेट क्लबच्या वतीने युवानेते मुन्नाभैय्या ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित वनहाफ क्रिकेट स्पर्धेत सय्यद रायडर्स सिरसाळा संघाने विजेतेपद पटकावले. बुधवारी झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात सय्यद रायडर्सने एकता क्रिकेट क्लब दिंद्रुडचा ८ विकेटने पराभव करत ट्रॉफी आणि ५१ हजार रुपयांचे पारितोषिक जिंकले.

RelatedPosts

दिव्यांग पेन्शन वाढीसाठी राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन

दिव्यांग बांधवांना दरमहा ६ हजार रुपये पेन्शन द्या; राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

गरजवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षण हक्कासाठी १ डिसेंबरपासून गागोदे बुद्रुक येथे सत्याग्रह

या स्पर्धेत परभणी जिल्ह्यातील पाथरी, गंगाखेड, सोनपेठ तसेच बीड जिल्ह्यातील बीड, परळी, माजलगाव व धारूर तालुक्यांतील ३० ग्रामीण आणि शहरी क्रिकेट संघांनी सहभाग नोंदवला. बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीत सय्यद रायडर्स सिरसाळा संघाने महातपुरी, गंगाखेड संघावर मात केली, तर एकता क्रिकेट क्लब दिंद्रुडने आदीअनुज क्रिकेट संघ परळीचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

अंतिम सामन्यात एकता क्रिकेट क्लब दिंद्रुडने प्रथम फलंदाजी करत निर्धारित ८ षटकांत ८४ धावांचे आव्हान उभे केले. प्रत्युत्तरात सय्यद रायडर्स सिरसाळाच्या फलंदाजांनी आक्रमक खेळ करत अवघ्या ५ षटकांत ८८ धावा फटकावल्या. त्यामुळे सिरसाळा संघाने ८ विकेटने दणदणीत विजय मिळवत स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले.

अंबाजोगाईचे पंच अमोल गोचडे आणि दिंद्रुडचे रवि काशिद यांनी अचूक निर्णय देत सामन्याची धुरा सांभाळली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण दिंद्रुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश भोसले, युवानेते मुन्ना ठोंबरे, शाम काशिद, शेख वसीम, विकास लगड आणि सिद्धार्थ मायंदळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

दिंद्रुड पोलीस आणि स्थानिक युवकांच्या देखरेखीखाली ही स्पर्धा शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. क्रीडा समालोचक महादेव मुजमुले, बाबा किरवले आणि शाम काशिद यांनी प्रभावी समालोचन केले. ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या स्पर्धेला क्रिकेटप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी समितीतील सिद्धेश्वर ठोंबरे, आत्माराम चामनार, सुरेश राठोड, मुंजा पारेकर, किशोर ठोंबरे, गणेश काटकर, बाळासाहेब ठोंबरे, अजित काकडे, दिग्विजय ठोंबरे आणि अलीम सय्यद यांनी उत्कृष्ट नियोजन केले.

Ad 1
Tags: Kishor Ghyatidak
Previous Post

दिव्यांग पेन्शन वाढीसाठी राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन

Related Posts

दिव्यांग पेन्शन वाढीसाठी राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन
ताज्या घडामोडी

दिव्यांग पेन्शन वाढीसाठी राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन

November 21, 2026
0
दिव्यांग बांधवांना दरमहा ६ हजार रुपये पेन्शन द्या; राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
ताज्या घडामोडी

दिव्यांग बांधवांना दरमहा ६ हजार रुपये पेन्शन द्या; राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

November 21, 2026
2
गरजवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षण हक्कासाठी १ डिसेंबरपासून गागोदे बुद्रुक येथे सत्याग्रह
ताज्या घडामोडी

गरजवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षण हक्कासाठी १ डिसेंबरपासून गागोदे बुद्रुक येथे सत्याग्रह

November 21, 2026
3
जळकोटमध्ये टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरी
ताज्या घडामोडी

जळकोटमध्ये टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरी

November 21, 2026
5
चिखली येथे गाडेकर मळा ते झरेकर वस्ती १.५ कि.मी. शेतपाणंद रस्ता खुला; प्रत्यक्ष कामाला सुरुवात
ताज्या घडामोडी

चिखली येथे गाडेकर मळा ते झरेकर वस्ती १.५ कि.मी. शेतपाणंद रस्ता खुला; प्रत्यक्ष कामाला सुरुवात

November 20, 2026
29
पाणी उपसा बंदी शिथिल केल्यास श्रीगोंदा इतर तालुक्यांना चारा पुरवू शकतो
ताज्या घडामोडी

पाणी उपसा बंदी शिथिल केल्यास श्रीगोंदा इतर तालुक्यांना चारा पुरवू शकतो

November 20, 2026
18

ताज्या बातम्या

सय्यद रायडर्स सिरसाळा संघाने पटकावली वनहाफ क्रिकेट स्पर्धेची ट्रॉफी

सय्यद रायडर्स सिरसाळा संघाने पटकावली वनहाफ क्रिकेट स्पर्धेची ट्रॉफी

November 21, 2026
दिव्यांग पेन्शन वाढीसाठी राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन

दिव्यांग पेन्शन वाढीसाठी राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन

November 21, 2026
दिव्यांग बांधवांना दरमहा ६ हजार रुपये पेन्शन द्या; राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

दिव्यांग बांधवांना दरमहा ६ हजार रुपये पेन्शन द्या; राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

November 21, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In