कॅपॅसिटर डीपीला आग लागल्याने परिसरात खळबळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
केज | प्रतिनिधी : केज येथील १३२ के.व्ही. वीज उपकेंद्रातील कॅपॅसिटर डीपीला भीषण आग लागल्याची घटना घडली. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आगीच्या ज्वाळा आणि धुरामुळे परिसरातील नागरिकांचे लक्ष या घटनेकडे वेधले गेले. या घटनेमुळे वीज उपकेंद्रातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली, या घटनेत किती नुकसान झाले आणि वीजपुरवठ्यावर काय परिणाम झाला, याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
या घटनेनंतर महावितरण प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते आणि आगीच्या कारणांचा तपास कसा केला जातो, याकडे केज परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.










