• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिष्यवृत्ती परीक्षेत श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयाचे घवघवीत यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
शिष्यवृत्ती परीक्षेत श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयाचे घवघवीत यश
0
SHARES
51
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा | प्रतिनिधी

नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालय यांनी उल्लेखनीय यश संपादन करत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. रयत शिक्षण संस्था संचलित या विद्यालयातील विद्यार्थिनींनी गुणवत्तेची परंपरा कायम ठेवत उत्कृष्ट कामगिरी केली.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेस विद्यालयातून १०४ विद्यार्थिनी प्रविष्ठ झाल्या होत्या. त्यापैकी ६९ विद्यार्थिनी पात्र ठरल्या असून निकालाची टक्केवारी ६६.३३ टक्के इतकी लागली. पाचवीतील गुणवंत विद्यार्थिनींमध्ये भूमी दादा साळुंके हिने २४६ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तर सान्वी सुधीर साबळे (२३८), सृष्टी काकासाहेब खोसे (२२४), श्रावणी उद्धव दिंडे (२२२) आणि आरोही शरद तरटे (२२०) यांनीही उल्लेखनीय यश मिळवले.

या विद्यार्थिनींना मराठी विषयासाठी श्रीमती राऊत एस. डी., गणितासाठी श्रीमती वाघचौरे एस. व्ही., इंग्रजीसाठी श्रीमती घोडे पी. बी. तसेच बुद्धिमत्तेसाठी श्री. गारुडकर एस. जी. यांनी मार्गदर्शन केले.

इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेस ८८ विद्यार्थिनी प्रविष्ठ झाल्या होत्या. त्यापैकी ४५ विद्यार्थिनी पात्र ठरल्या असून निकालाची टक्केवारी ५२.९ टक्के लागली. गुणवंत विद्यार्थिनींमध्ये स्वरांजली संदीप भगत हिने २७४ गुण मिळवत अव्वल स्थान मिळवले. तर समृद्धी सचिन शेळके (२६८), नीता नितीन सप्रे (२६४), श्राव्या मच्छिंद्र लोखंडे (२६२) आणि मयुरी लहू गांगर्डे (२६०) यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले.

आठवीच्या विद्यार्थिनींना मराठी विषयासाठी श्री. शिंदे के. डी., गणितासाठी श्री. खामकर के. जी., इंग्रजीसाठी श्री. खेडकर डी. सी. तसेच बुद्धिमत्ता विषयासाठी श्रीमती कळसकर एस. एस. यांनी मार्गदर्शन केले.

विद्यालयाच्या या यशाबद्दल मुख्याध्यापिका वर्षा भोईटे, पर्यवेक्षक बाळासाहेब शिंदे, गुरुकुलप्रमुख किरण शिंदे तसेच संस्थेचे पदाधिकारी, स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, पालक संघ आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी विद्यार्थिनी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Tags: Shrirang Salwe
Previous Post

लायन्स क्लबचा “सन्मान कर्तृत्वाचा” पुरस्कार सोहळा व ‘काव्यरंग’ कवी संमेलन उत्साहात संपन्न

Next Post

महेश्वर मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या विसापूर शाखेचे उद्घाटन

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
1
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
24
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
103
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
56
Next Post
महेश्वर मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या विसापूर शाखेचे उद्घाटन

महेश्वर मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या विसापूर शाखेचे उद्घाटन

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In