• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लायन्स क्लबचा “सन्मान कर्तृत्वाचा” पुरस्कार सोहळा व ‘काव्यरंग’ कवी संमेलन उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

लातूर | प्रतिनिधी

लायन्स क्लब ऑफ लातूर सिटी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “सन्मान कर्तृत्वाचा” राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आणि ‘काव्यरंग’ कवी संमेलन दयानंद सांस्कृतिक सभागृह येथे मोठ्या उत्साहात व रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागनाथ गित्ते हे होते, तर उद्घाटक म्हणून डॉ. भारत बास्टेवाड उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून अमोल तांबे यांची उपस्थिती लाभली. तसेच विलास बडे यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची माहिती संयोजक अनिल पुरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

यावेळी समाजात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिशा प्रतिष्ठान, समर्पण फाउंडेशन, आदर्श मैत्री फाउंडेशन, ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन, तुकाराम पाटील मित्र मंडळ आणि बालरंगभूमी परिषद या संस्थांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

तसेच पत्रकार शशिकांत पाटील, आसावरी बोधनकर-जोशी, सुशील सूर्यवंशी, महेश हेड्डा, बालाजी जगताप, अण्णाराव खोडेवाड, संजय राजुळे तसेच नागपूर येथील दिपाली आणि अंजली राठोड यांना “सन्मान कर्तृत्वाचा” या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

कार्यक्रमात डॉ. भारत बास्टेवाड, अमोल तांबे आणि विलास बडे यांनी उपस्थितांना संबोधित केले.

कवी संमेलनात महाराष्ट्रातील नामवंत कवी नारायण पुरी, रविंद्र केसकर, निलेश चव्हाण, गुंजन पाटील आणि अविनाश भारती यांनी आपल्या कवितांचे सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली. कवी संमेलनामुळे कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागनाथ गित्ते यांनी केले. सूत्रसंचालन अनिल पुरी यांनी केले, तर आभार अॅड. योगेश शिंदे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ईश्वरप्रसाद चांडक, राजेश मित्तल, जगदीश हेड्डा, अनिल झंवर, संजय राजुळे, राधेश्याम धूत, प्रशांत रेड्डी, सचिन चेवले, व्यंकट ठणके, सुहास पाचेगावकर, बसवराज मंगरुळे, लक्ष्मीकांत कालिया, मनोज देशमुख आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला लातूरकरांचा मोठा प्रतिसाद लाभला.

Previous Post

लातुरात बनावट सोन्याचे बिस्कीट विकणारी गँग जेरबंद; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त, ८ गुन्हे उघड

Next Post

शिष्यवृत्ती परीक्षेत श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयाचे घवघवीत यश

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
5
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
11
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
17
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
17
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
7
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
223
Next Post
शिष्यवृत्ती परीक्षेत श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयाचे घवघवीत यश

शिष्यवृत्ती परीक्षेत श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयाचे घवघवीत यश

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In