• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

डिझेल टंचाईमुळे शेतकरी संतप्त; “आता पाणी पंप उचलून पेट्रोल पंपावर आणायचा का?”

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in Blog
0
डिझेल टंचाईमुळे शेतकरी संतप्त; “आता पाणी पंप उचलून पेट्रोल पंपावर आणायचा का?”
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

अंबाजोगाई | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या डिझेल आणि पेट्रोलच्या तीव्र टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. पेट्रोल पंपांवर कॅन किंवा बॅरलमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याने शेतीची कामे ठप्प झाली असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

RelatedPosts

पुण्यात निधीच्या मुद्द्यावरून भाजप-राष्ट्रवादी संघर्ष पेटला

वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

अंबाजोगाई परिसरातील शेतकऱ्यांनी “आता काय विहिरीचा पाणी पंप उपटून पेट्रोल पंपावर घेऊन यायचा का?” असा संतप्त सवाल प्रशासनाला केला आहे.

शेतातील नांगरणी, पेरणी आणि मशागतीची कामे ट्रॅक्टरवर अवलंबून असताना डिझेलअभावी अनेक कामे खोळंबली आहेत. त्यातच विजेचा लपंडाव सुरू असल्याने विहिरी आणि बोअरवेलवरील डिझेल पंप बंद पडले आहेत. परिणामी उभी पिके करपण्याच्या मार्गावर असल्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

दुर्गम भागातील अनेक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर थेट पेट्रोल पंपावर नेणे शक्य नसते. तसेच विहिरींवरील स्थिर पंप हलवणेही शक्य नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत. नियमांचा हवाला देत कॅनमध्ये डिझेल नाकारले जात असल्याने पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे.

उन्हाचा पारा वाढत असताना पिकांना पाण्याची नितांत गरज असते. मात्र, ऐन हंगामात इंधन टंचाई निर्माण झाल्याने हातातोंडाशी आलेले पीक धोक्यात आले आहे. “आम्ही काळाबाजारासाठी नव्हे, तर शेतीसाठी डिझेल मागत आहोत,” असे शेतकरी संघटनांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांसोबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांना निवेदन देत तातडीने कॅनमध्ये डिझेल देण्याची व्यवस्था करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Previous Post

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा तडाखा; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Next Post

रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाईच्या कार्याचे प्रांतपालांकडून कौतुक

Related Posts

Blog

पुण्यात निधीच्या मुद्द्यावरून भाजप-राष्ट्रवादी संघर्ष पेटला

August 25, 2026
16
वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
Blog

वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

August 25, 2026
5
राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!
Blog

राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

August 25, 2026
55
धामणीत श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या शताब्दी महोत्सवाचा धर्मध्वज उभारणीने शुभारंभ…!
Blog

धामणीत श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या शताब्दी महोत्सवाचा धर्मध्वज उभारणीने शुभारंभ…!

August 25, 2026
4
एस.टी. तिकीट दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन
Blog

एस.टी. तिकीट दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

August 25, 2026
76
Blog

दुर्घटनेच्या प्रतीक्षेत प्रशासन, मारेगाव, मार्डी चौक व आंबेडकर चौक सिग्नल लाईट तथा ट्राफिक हवालदार यांची नियुक्ती गरजेची………

August 25, 2026
6
Next Post
रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाईच्या कार्याचे प्रांतपालांकडून कौतुक

रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाईच्या कार्याचे प्रांतपालांकडून कौतुक

ताज्या बातम्या

पुण्यात निधीच्या मुद्द्यावरून भाजप-राष्ट्रवादी संघर्ष पेटला

August 25, 2026
वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

August 25, 2026
राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In