• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाईच्या कार्याचे प्रांतपालांकडून कौतुक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाईच्या कार्याचे प्रांतपालांकडून कौतुक
0
SHARES
26
VIEWS
Ad 1

सामाजिक बांधिलकी जोपासत पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात

अंबाजोगाई | प्रतिनिधी

रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाई यांच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळा आणि प्रांतपाल भेट कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला व युवतींचा सन्मान करण्यात आला.

RelatedPosts

वादळ-पावसाने केळी बागा जमिनदोस्त; ८०० झाडांचे नुकसान, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी

‘स्वतंत्र विदर्भ राज्य मिशन-२०२७’ अंतर्गत पश्चिम विदर्भात जनजागर अभियान; राज्याच्या मागणीला बळ देण्याचा निर्धार

मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला पारगावात वेग; नागरिकांनी आधारकार्ड व छायाचित्रासह ग्रामपंचायतीत भेट द्यावी

अंबाजोगाई येथील टी. बी. गिरवलकर अभियांत्रिकी महाविद्यालय येथे दि. २१ मे २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमास रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे प्रांतपाल सुधीर लातुरे यांनी अधिकृत भेट देत क्लबच्या कार्याचा आढावा घेतला.

यावेळी फर्स्ट लेडी संगीता लातुरे, उपप्रांतपाल डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. तापडिया, क्लबचे अध्यक्ष भिमाशंकर न. शिंदे तसेच सचिव सुनील व्यवहारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात भिमाशंकर न. शिंदे यांनी रोटरीच्या माध्यमातून अंबाजोगाई परिसरात समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. “जिथे कमी तिथे आम्ही” ही भावना जपत सामाजिक कार्य अधिक व्यापक करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

उपप्रांतपाल डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी क्लबच्या कार्याचे कौतुक करत नव्या नेतृत्वातून रोटरीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

अध्यक्षीय समारोपात सुधीर लातुरे यांनी अवघ्या आठ महिन्यांत क्लबने समाजातील गरजूं पर्यंत पोहोचून उल्लेखनीय काम केल्याचे सांगितले. “हा क्लब भविष्यात जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण करेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी ईशा जोशी यांना “रोटरी आत्मनिर्भर पुरस्कार” तर दिपाली जाधव आणि रमेश सोमवंशी या दांपत्याला “रोटरी सक्षम पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

तसेच स्वर्गीय संजय गिरी यांच्या पत्नी अर्चना गिरी यांना उदरनिर्वाहासाठी पिको फॉल मशीन देऊन सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात रोटरीचे संस्थापक पॉल हॅरिस यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. सूत्रसंचालन गणेश तौर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुनील व्यवहारे यांनी मानले.

या कार्यक्रमाला सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, पत्रकारिता, सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

डिझेल टंचाईमुळे शेतकरी संतप्त; “आता पाणी पंप उचलून पेट्रोल पंपावर आणायचा का?”

Next Post

भडगाव नगरपरिषदेकडून मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिमेला वेग

Related Posts

ताज्या घडामोडी

वादळ-पावसाने केळी बागा जमिनदोस्त; ८०० झाडांचे नुकसान, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी

July 10, 2026
13
ताज्या घडामोडी

‘स्वतंत्र विदर्भ राज्य मिशन-२०२७’ अंतर्गत पश्चिम विदर्भात जनजागर अभियान; राज्याच्या मागणीला बळ देण्याचा निर्धार

July 10, 2026
1
ताज्या घडामोडी

मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला पारगावात वेग; नागरिकांनी आधारकार्ड व छायाचित्रासह ग्रामपंचायतीत भेट द्यावी

July 10, 2026
11
ताज्या घडामोडी

उर्दू माध्यमातील विद्यार्थिनींसाठी शिरपूर–पातूर मानव विकास बससेवा सुरू करण्याची विधान परिषदेत मागणी; आ. भावना गवळींचा पाठपुरावा

July 10, 2026
18
ताज्या घडामोडी

मतदार यादी विशेष पुनरीक्षण (SIR) मोहिमेसंदर्भात नेकनूर ग्रामपंचायतीत बीएलओंची आढावा बैठक

July 10, 2026
21
ताज्या घडामोडी

समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांना दिला दिलासा; खरीप हंगामाबाबत आशा पल्लवित, सोयाबीन लागवडीकडे वाढता कल

July 9, 2026
12
Next Post
भडगाव नगरपरिषदेकडून मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिमेला वेग

भडगाव नगरपरिषदेकडून मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिमेला वेग

ताज्या बातम्या

तालुका कृषी अधिकारी कार्यालयात उद्धवसेनेचे ठिय्या आंदोलन; निकृष्ट सोयाबीन बियाणे कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

July 11, 2026

नाशिक रोड रेल्वे स्थानकावर मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांना अवघ्या सहा तासांत अटक

July 11, 2026

आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते पंढरपूर सायकल वारीला हिरवा झेंडा; शेकडो सायकलिस्ट वारकरी पंढरपूरकडे रवाना

July 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In