• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भडगाव नगरपरिषदेकडून मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिमेला वेग

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
भडगाव नगरपरिषदेकडून मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिमेला वेग
0
SHARES
10
VIEWS
Ad 1
Ad 1

भडगाव | प्रतिनिधी

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणी तुंबणे, सांडपाण्याचा अडथळा तसेच पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी भडगाव नगरपरिषदेकडून मान्सूनपूर्व नाले व ड्रेनेज सफाई मोहिमेला वेग देण्यात आला आहे. दि. २० मेपासून सुरू करण्यात आलेल्या या विशेष मोहिमेंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये नालेसफाई, ड्रेनेज साफसफाई तसेच रस्त्यालगत वाढलेले गवत, झाडे-झुडपे आणि मातीचे ढिगारे हटविण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.

RelatedPosts

माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत माहूरमध्ये अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

अकोट शहरात अतिक्रमणाचा विळखा; फेरीवाले आणि ऑटो रिक्षांमुळे वाहतूक कोंडी

सुरेगाव रस्ता येथील हनुमान मंदिरात काकडा भजनाचा भक्तिमय सोहळा

मोहिमेची सुरुवात बाळद रोड परिसरातील ड्रेनेज सफाईने करण्यात आली असून जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर गाळ व कचरा हटविण्यात येत आहे. मागील पावसाळ्यात नागरिकांना आलेल्या अडचणी लक्षात घेऊन यंदा सर्व प्रमुख नाले व पाण्याचा विसर्ग होणाऱ्या मार्गांची व्यापक साफसफाई करण्याचा निर्णय नगरपरिषदेकडून घेण्यात आला आहे.

३ जूनपर्यंत विशेष स्वच्छता मोहीम

नगरपरिषदेच्या नियोजनानुसार बाळद रोड, तळणी ते बाळद रोड, जयकिसान कॉलनी, दत्तनगर, जयहिंद कॉलनी, शिवशक्ती कॉलनी, पोलीस लाईन, एच कॉलनी, गणपती मंदिर ते सिव्हील हॉस्पिटल परिसर, कोल्हा नाला, ग्रीन पार्क कॉलनी, न्यायालय परिसर, भागवत कॉलनी आदी भागांमध्ये नालेसफाईचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

दि. २० मे ते ३ जूनदरम्यान ही मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असून पुढील १५ ते २० दिवस शहरभर जेसीबी व मनुष्यबळाच्या सहाय्याने स्वच्छता मोहीम सुरू राहणार आहे.

ही मोहीम लोकनियुक्त नगराध्यक्षा रेखाताई मालचे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, गटनेते लखीचंद पाटील, आरोग्य सभापती इम्रान अली सय्यद तसेच विविध प्रभागांतील नगरसेवकांनी सहकार्य केले आहे.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, आरोग्य विभागाचे इंजि. सत्यम पाटील, श्रीमती निशा लोट व क्लार्क छोटू वैद्य यांनी प्रभागनिहाय नियोजन करून मोहिमेची अंमलबजावणी सुरू केली आहे.

शहरातील कोल्हा नाला, ग्रीन पार्क नाला, टोणगाव नाला तसेच शिवनेरी गेट परिसरातील नाल्यांचीही व्यापक साफसफाई करण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे पावसाळ्यातील संभाव्य अडचणी टाळण्यास मदत होणार असून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे.

Ad 1
Previous Post

रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाईच्या कार्याचे प्रांतपालांकडून कौतुक

Next Post

पाचोरा-भडगावमध्ये विधान परिषदेसाठी अमोल शिंदे चर्चेत

Related Posts

माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत माहूरमध्ये अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
ताज्या घडामोडी

माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत माहूरमध्ये अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

November 24, 2026
14
अकोट शहरात अतिक्रमणाचा विळखा; फेरीवाले आणि ऑटो रिक्षांमुळे वाहतूक कोंडी
ताज्या घडामोडी

अकोट शहरात अतिक्रमणाचा विळखा; फेरीवाले आणि ऑटो रिक्षांमुळे वाहतूक कोंडी

November 24, 2026
4
सुरेगाव रस्ता येथील हनुमान मंदिरात काकडा भजनाचा भक्तिमय सोहळा
ताज्या घडामोडी

सुरेगाव रस्ता येथील हनुमान मंदिरात काकडा भजनाचा भक्तिमय सोहळा

November 24, 2026
32
धाकटी पंढरी ताकई यात्रोत्सवानिमित्त खोपोली परिसरात जड वाहनांना वाहतूक बंदी
ताज्या घडामोडी

धाकटी पंढरी ताकई यात्रोत्सवानिमित्त खोपोली परिसरात जड वाहनांना वाहतूक बंदी

November 24, 2026
1
सहायक आयुक्त नितीन बोबडे यांना मारहाण; अमरावती महापालिकेत कामबंद आंदोलन
ताज्या घडामोडी

सहायक आयुक्त नितीन बोबडे यांना मारहाण; अमरावती महापालिकेत कामबंद आंदोलन

November 24, 2026
7
गुरु नानक जयंती आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भक्तिमय वातावरण
ताज्या घडामोडी

गुरु नानक जयंती आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भक्तिमय वातावरण

November 24, 2026
11
Next Post
पाचोरा-भडगावमध्ये विधान परिषदेसाठी अमोल शिंदे चर्चेत

पाचोरा-भडगावमध्ये विधान परिषदेसाठी अमोल शिंदे चर्चेत

ताज्या बातम्या

माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत माहूरमध्ये अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत माहूरमध्ये अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

November 24, 2026
अकोट शहरात अतिक्रमणाचा विळखा; फेरीवाले आणि ऑटो रिक्षांमुळे वाहतूक कोंडी

अकोट शहरात अतिक्रमणाचा विळखा; फेरीवाले आणि ऑटो रिक्षांमुळे वाहतूक कोंडी

November 24, 2026
सुरेगाव रस्ता येथील हनुमान मंदिरात काकडा भजनाचा भक्तिमय सोहळा

सुरेगाव रस्ता येथील हनुमान मंदिरात काकडा भजनाचा भक्तिमय सोहळा

November 24, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In