• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाचोरा-भडगावमध्ये विधान परिषदेसाठी अमोल शिंदे चर्चेत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
पाचोरा-भडगावमध्ये विधान परिषदेसाठी अमोल शिंदे चर्चेत
0
SHARES
26
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधी | पाचोरा-भडगाव

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून जळगाव जिल्ह्यातील पाचोरा-भडगाव मतदारसंघातून भाजपाचे युवा नेते अमोल भाऊ शिंदे यांचे नाव चर्चेत आले आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

जळगाव जिल्हा विधान परिषद जागा गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाचे संख्याबळ मजबूत मानले जाते. त्यामुळे ही जागा पुन्हा भाजपाकडेच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटाकडूनही या जागेवर दावा करण्यात येत आहे.

दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच आमदार किशोर पाटील यांच्या कुटुंबीयांच्या नावांची चर्चा सुरू असताना काही तांत्रिक अडचणींमुळे समीकरणे बदलत असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत भाजपातील निष्ठावंत आणि तळागाळाशी संपर्क असलेले नेतृत्व म्हणून अमोल भाऊ शिंदे यांचे नाव पुढे येत आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत युतीतील जागावाटपामुळे भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्याने अमोल शिंदे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्या वेळी त्यांनी दिलेली लढत मतदारसंघात चर्चेचा विषय ठरली होती. पराभव झाला असला तरी त्यांच्या जनाधाराची ताकद अधोरेखित झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

भाजपाचे ज्येष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या अमोल शिंदे यांनी युवक, शेतकरी, बेरोजगारी, ग्रामीण विकास आणि सामाजिक प्रश्नांवर सातत्याने भूमिका घेतल्याचे सांगितले जाते.

“फक्त घराणेशाहीच का? तळागाळातील कार्यकर्त्यांनाही संधी मिळायला हवी,” अशी भावना स्थानिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत अभ्यासू, संघर्षशील आणि विकासाभिमुख नेतृत्वाला संधी देण्याची गरज व्यक्त होत असून अमोल शिंदे यांना संधी मिळाल्यास भाजपाला राजकीयदृष्ट्या फायदा होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Ad 1
Tags: Shubham Surana
Previous Post

भडगाव नगरपरिषदेकडून मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिमेला वेग

Next Post

जतमध्ये जागर फाउंडेशनतर्फे भव्य स्वच्छता अभियान

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
जतमध्ये जागर फाउंडेशनतर्फे भव्य स्वच्छता अभियान

जतमध्ये जागर फाउंडेशनतर्फे भव्य स्वच्छता अभियान

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In