• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाथरी नगर परिषदेत बनावट अभिलेख प्रकरणाचा आरोप; नगराध्यक्षांसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
पाथरी नगर परिषदेत बनावट अभिलेख प्रकरणाचा आरोप; नगराध्यक्षांसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

पाथरी | प्रतिनिधी :

पाथरी नगर परिषदेमध्ये शासकीय अभिलेखांमध्ये फेरफार, खोटी नोंद, बनावट कागदपत्रांची निर्मिती तसेच मुख्याधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्यांचा वापर करून शासकीय कामकाजात फसवणूक केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी नगराध्यक्षांसह पाच जणांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

RelatedPosts

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा

निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; कारवाई व मदतीची मागणी

शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन

या संदर्भात नगर परिषदेचे स्वीकृत सदस्य अब्दुल्ला खान लतीफ खान दुर्रानी यांनी २१ मे रोजी पाथरी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.

पाच जणांची नावे तक्रारीत नमूद

तक्रारीमध्ये नगराध्यक्ष आसेफ खान शेरगुल खान पठाण, कार्यालयीन अधीक्षक अशोक वाघुंबरे, कर निर्धारक तथा प्रशासकीय कर्मचारी सुरेश जोशी, कर्मचारी मिना दिगंबर आगळे व श्रीमती इंगळे यांची नावे नमूद करण्यात आली आहेत.

DocScanner 23 May 2026 4-26 pmDownload

सभेतील अनियमितता आणि बनावट ठरावाचा आरोप

तक्रारीनुसार, पाथरी नगर परिषदेमध्ये स्थायी मुख्याधिकाऱ्यांचे पद रिक्त असताना अतिरिक्त मुख्याधिकाऱ्यांकडे प्रशासनाचा कार्यभार होता. अशा परिस्थितीत १६ मार्च २०२६ रोजी अर्थसंकल्पीय विशेष सभा घेण्यात आली.

मात्र, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील नियमांनुसार आवश्यक गणपूर्ती नसतानाही ही सभा बेकायदेशीररीत्या घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. सभेत कोणत्याही विषयावर चर्चा किंवा ठराव मंजूर न होता खोटी कार्यवाही नोंदविण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

अभिलेख दडपणे व जावक क्रमांकात फेरफार

१६ मार्चच्या सभेचे हजेरीपत्रक वारंवार मागणी करूनही उपलब्ध करून देण्यात आले नसल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. संबंधित अभिलेख जाणूनबुजून दडवून त्यामध्ये फेरफार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

कार्यालयीन अधीक्षक अशोक वाघुंबरे यांनी सभेत चर्चा न झालेल्या “जुना आठवडी बाजार” या विषयाचा खोटा ठराव तयार करून तो मिनिट बुकमध्ये नोंदवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

खोट्या नोटिसा व स्वाक्षरीचा वापर

तसेच १० एप्रिल व १३ एप्रिल २०२६ रोजी नगराध्यक्षांनी स्वतःच्या स्वाक्षरीने खोट्या नोटिसा तयार केल्याचा आरोप आहे. या नोटिसांवर एकाच जावक क्रमांकाचा वापर करून तारखांमध्ये फेरफार करण्यात आला असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

तत्कालीन मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी ११ मे २०२६ रोजी दिलेल्या लेखी पत्रात संबंधित नोटिसांवरील स्वाक्षऱ्या आपल्या नसल्याचे स्पष्ट केल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.

कर्मचारी व अधिकाऱ्यांवर संगनमताचा आरोप

सुरेश जोशी यांनी संगनमत करून मुख्याधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच आवक-जावक विभागातील कर्मचारी मिना आगळे व श्रीमती इंगळे यांनी एकाच जावक क्रमांकाचा वापर करून बनावट नोटिसा तयार केल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे.

कठोर कारवाईची मागणी

नगराध्यक्षांनी काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून बनावट अभिलेख तयार करून शासकीय कामकाजात गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी बनावट दस्तऐवज तयार करणे, शासकीय अभिलेखांमध्ये फेरफार, फसवणूक, पदाचा गैरवापर आणि गुन्हेगारी कट अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शहरात खळबळ

या गंभीर आरोपांमुळे पाथरी नगर परिषदेत खळबळ उडाली असून पोलीस प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Tags: Ahamad Ansari
Previous Post

आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; किन्ही परिसरात पिकांचे मोठे नुकसान, जनजीवन विस्कळीत

Next Post

करमाळा-जामखेड रस्त्यासाठी ३०० कोटी मंजूर; ४० किमी मार्गाचे रुपडे बदलणार

Related Posts

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा
ताज्या घडामोडी

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा

July 12, 2026
0
निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; कारवाई व मदतीची मागणी
ताज्या घडामोडी

निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; कारवाई व मदतीची मागणी

July 12, 2026
6
शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन
ताज्या घडामोडी

शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन

July 12, 2026
2
नंदुरबारची शान! ७ वर्षीय प्रनिका पाटीलचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनात गौरव
ताज्या घडामोडी

नंदुरबारची शान! ७ वर्षीय प्रनिका पाटीलचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनात गौरव

July 12, 2026
0
ताज्या घडामोडी

रोटरी क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी शिवाजी बाबर; सचिवपदी अमित पाटील यांची निवड

July 12, 2026
47
ताज्या घडामोडी

शिरढोण–कुरुंदवाड मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू; पुलावरील पाणी ओसरले, मात्र जलपर्णीचा विळखा कायम

July 12, 2026
9
Next Post
करमाळा-जामखेड रस्त्यासाठी ३०० कोटी मंजूर; ४० किमी मार्गाचे रुपडे बदलणार

करमाळा-जामखेड रस्त्यासाठी ३०० कोटी मंजूर; ४० किमी मार्गाचे रुपडे बदलणार

ताज्या बातम्या

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा

July 12, 2026
स्व. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त किणी (य) येथे मोफत नेत्ररोग निदान व शस्त्रक्रिया शिबिर; ८० रुग्णांची तपासणी

स्व. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त किणी (य) येथे मोफत नेत्ररोग निदान व शस्त्रक्रिया शिबिर; ८० रुग्णांची तपासणी

July 12, 2026

जि.प. केंद्रीय कन्या शाळा, अमळनेर (भां.) येथे श्री. वारे सर यांची केंद्रप्रमुखपदी नियुक्ती; शिक्षक, पालक व ग्रामस्थांकडून अभिनंदन

July 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In