• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 12, 2026
in ताज्या घडामोडी
0
शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन
0
SHARES
23
VIEWS
Ad 1
Ad 1

शहादा | प्रतिनिधी

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

शहादा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकावर गेल्या सहा महिन्यांपासून पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर शहादा नगर परिषदेच्या शिक्षण व क्रीडा समितीच्या सभापती तथा नगरसेविका भावना चंद्रभान कदम यांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देत तातडीने प्रकाश व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.

भावना कदम यांनी निवेदनात नमूद केले आहे की, शिवस्मारकावर प्रकाश व्यवस्था करण्याबाबत त्यांनी पहिल्या सर्वसाधारण सभेपूर्वीच लेखी अर्ज दिला होता. मात्र, सहा महिने उलटूनही नगर परिषद प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही.

त्यांनी पुढे सांगितले की, २ जुलै रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्षांनी शिवस्मारक समितीकडून अर्ज आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे सांगितले होते. मात्र, शिवस्मारक समितीने यापूर्वीच मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्याकडे प्रकाश व्यवस्थेसाठी अर्ज सादर केला असून त्याची प्रतही निवेदनासोबत जोडण्यात आली आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि पराक्रम आजही समाजाला प्रेरणा देतात. त्यांच्या स्मारकाची अशी दुरवस्था होणे दुर्दैवी आहे. शिवप्रेमींच्या भावनांचा आदर राखत स्मारकावर आकर्षक आणि पुरेशी विद्युत प्रकाश व्यवस्था तातडीने करावी,” अशी मागणी भावना कदम यांनी केली आहे.

यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉ. चंद्रभान कदम व सहकाऱ्यांनी मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांची भेट घेऊनही चर्चा केली आहे.

या निवेदनानंतर शहादा नगर परिषद प्रशासन शिवस्मारकावरील प्रकाश व्यवस्थेबाबत किती लवकर निर्णय घेते, याकडे शहादावासीयांसह शिवप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Ad 1
Tags: Netradipak Kuwar
Previous Post

नंदुरबारची शान! ७ वर्षीय प्रनिका पाटीलचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनात गौरव

Next Post

शहाद्यातील समाज कल्याण वस्तीगृहात संशयित अन्न विषबाधा; ४० विद्यार्थी आजारी, ५ जणांवर विशेष उपचार

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
शहाद्यातील समाज कल्याण वस्तीगृहात संशयित अन्न विषबाधा; ४० विद्यार्थी आजारी, ५ जणांवर विशेष उपचार

शहाद्यातील समाज कल्याण वस्तीगृहात संशयित अन्न विषबाधा; ४० विद्यार्थी आजारी, ५ जणांवर विशेष उपचार

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In