• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नंदुरबारची शान! ७ वर्षीय प्रनिका पाटीलचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनात गौरव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 12, 2026
in ताज्या घडामोडी
0
नंदुरबारची शान! ७ वर्षीय प्रनिका पाटीलचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनात गौरव
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

शहादा | प्रतिनिधी

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

नंदुरबार जिल्ह्याची शान ठरलेल्या सात वर्षीय कु. प्रनिका प्रफुल्ल पाटील हिचा मुंबई येथील विधानभवनात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तिच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे नंदुरबार जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

प्रनिकाने डिसेंबर महिन्यात पुणे येथे आयोजित आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले होते. अवघ्या ३ मिनिटे ३९ सेकंदांत १२० गणिती प्रश्न अचूक सोडवत तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये तिच्या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे.

या यशाबद्दल विधानभवनात झालेल्या गौरव सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी शहादा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन तसेच अनेक आमदार, मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी प्रनिकाच्या बुद्धिमत्ता, मेहनत आणि कर्तृत्वाचे कौतुक करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कु. प्रनिका ही औरंगपूर येथील प्रगतिशील शेतकरी सुरेश गिरधर पाटील यांची नात असून, शहादा येथील शल्यचिकित्सक ॲड. डॉ. प्रफुल्ल सुरेश पाटील यांची कन्या आहे. तिच्या यशामागे आई निकिता पाटील यांचे प्रोत्साहन आणि अबॅकस प्रशिक्षिका स्मिता सोनार यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रनिकाच्या या अभूतपूर्व यशामुळे शहाद्यासह संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

महावितरण कर्मचाऱ्यांसोबतच्या वादानंतर वृद्धाचा मृत्यू; पिंपरी गावात तणाव

Next Post

शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
7
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post
शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन

शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In