• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजरा हायस्कूलमध्ये एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
आजरा हायस्कूलमध्ये एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
0
SHARES
21
VIEWS
Ad 1
Ad 1

आजरा :
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून मुलींचे संरक्षण करण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेअंतर्गत आजरा हायस्कूल येथे विशेष मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी व उपकेंद्र पारेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात शिक्षक, पालक व विद्यार्थिनींना लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी आजरा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. ए. एल. तोडकर यांनी उपस्थित आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे स्वागत केले.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

“कर्करोगाविषयी जनजागृती काळाची गरज”

उपकेंद्र पारेवाडी येथील आरोग्य सेविका सुचिता मॅडम यांनी मार्गदर्शन करताना कर्करोगाच्या वाढत्या धोक्याविषयी माहिती दिली. त्या म्हणाल्या की, भारतात दररोज अनेक नागरिक कर्करोगामुळे मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे हा आजार होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून १४ ते १५ वयोगटातील मुलींना एचपीव्ही लस देणे अत्यंत आवश्यक आहे.

त्यांनी स्पष्ट केले की, खासगी रुग्णालयांमध्ये ही लस अत्यंत महागडी असून शासनामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ती मोफत उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता पालकांनी आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

“शासनाची योजना मुलींसाठी सुरक्षा कवच” – मुख्याध्यापक तोडकर

मुख्याध्यापक श्री. ए. एल. तोडकर यांनी शासनाच्या या मोफत लसीकरण उपक्रमाचे स्वागत करत आरोग्य विभागाचे आभार मानले. खासगी दवाखान्यांमध्ये या लसीसाठी मोठा खर्च करावा लागतो. सर्वसामान्य कुटुंबांना तो परवडत नसल्याने शासनाची ही योजना मुलींच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे सुरक्षा कवच ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आरोग्य सेवक दीपक हरणे, शिक्षक श्री. महेश केसरकर, सौ. मेघा पाटील, श्री. एस. जी. पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमानंतर आरोग्य विभागाच्या या जनजागृती मोहिमेचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

Ad 1
Tags: Gopal Gadkari
Previous Post

पेरणोलीतील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवले; ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण

Next Post

गुणवंतांच्या यशाने आजरा महाविद्यालयाची परंपरा कायम; बारावीतील विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
गुणवंतांच्या यशाने आजरा महाविद्यालयाची परंपरा कायम; बारावीतील विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

गुणवंतांच्या यशाने आजरा महाविद्यालयाची परंपरा कायम; बारावीतील विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In