• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी; हायवेवरून चालत्या ट्रकमधून चोरी झालेल्या मेंढ्या २४ तासांत जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी; हायवेवरून चालत्या ट्रकमधून चोरी झालेल्या मेंढ्या २४ तासांत जप्त
0
SHARES
42
VIEWS
Ad 1
Ad 1

धाराशिव प्रतिनिधी :
पोलीस ठाणे येरमाळा हद्दीत पहाटेच्या सुमारास हायवेवरून जाणाऱ्या चालत्या ट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी मेंढ्या चोरी करून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने सुमारे २ लाख ९ हजार रुपये किमतीच्या मेंढ्या जप्त करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला. त्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, RCP पथक क्रमांक १ आणि QRT पथक रवाना करण्यात आले.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

तपासादरम्यान येरमाळा हायवेवरील पुलाजवळ पोलीस पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, तेरखेडा येथील लक्ष्मी पारधी पिढी तसेच उमरा पारधी पिढी येथील काही इसमांनी चालत्या ट्रकमधून मेंढ्या चोरी करून आणल्या असून त्या उमरा पिढीजवळील बाभळीच्या झाडाखाली उभ्या असलेल्या लाल रंगाच्या टमटममध्ये ठेवण्यात आल्या आहेत.

ही माहिती मिळताच सपोनि तात्याराव भालेराव यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तेथे पोलीस पथक पोहोचताच ७ ते ८ संशयित इसम पळून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला मात्र आरोपी हाती लागले नाहीत.

यानंतर पोलिसांनी लाल रंगाच्या टमटमची तपासणी केली असता त्यामध्ये चोरीच्या मेंढ्या आढळून आल्या. फिर्यादीला संपर्क करून मेंढ्यांचे वर्णन सांगितले असता त्या मेंढ्या ट्रकमधून चोरी झालेल्याच असल्याचे स्पष्ट झाले.

पोलीसांनी मेंढ्या व टमटम असा एकूण ३ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी येरमाळा पोलीस ठाण्यात जमा केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके, सपोनि तात्याराव भालेराव, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, महिला पोलीस हवालदार शोभा बांगर, पोलीस नाईक संतोष तिघाडे, संदीप चौघुले, रोहित दंडनाईक, तसेच RCP व QRT पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली.

Ad 1
Tags: Ladlesab Nadaf
Previous Post

वंचितचे राम गायकवाड यांच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप; तहसीलदारांकडे निवेदन

Next Post

एनव्हीपी शुगर कारखान्यात तृतीय गळीत हंगामाचे मिल रोलर पूजन

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
एनव्हीपी शुगर कारखान्यात तृतीय गळीत हंगामाचे मिल रोलर पूजन

एनव्हीपी शुगर कारखान्यात तृतीय गळीत हंगामाचे मिल रोलर पूजन

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In