• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वंचितचे राम गायकवाड यांच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप; तहसीलदारांकडे निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
वंचितचे राम गायकवाड यांच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप; तहसीलदारांकडे निवेदन
0
SHARES
70
VIEWS
Ad 1
Ad 1

उमरगा / प्रतिनिधी –

उमरगा येथील मलंग कॉम्प्लेक्स परिसरात घडलेल्या मारहाण प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राम सैदा गायकवाड यांनी दाखल केलेला गुन्हा खोटा असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या पंचशीला कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदन सादर केले आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

दि. २२ मे रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मलंग कॉम्प्लेक्स येथील वंचितच्या कार्यालयात घुसून पंचशीला कांबळे, जयशंकर कांबळे आणि संघर्ष कांबळे यांनी चप्पल, लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार राम गायकवाड यांनी पोलिसांत दिली होती. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र, पंचशीला कांबळे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात वेगळीच भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, दि. २२ मे रोजी जयशंकर (विकी) कांबळे हे त्यांना घरी घेण्यासाठी कार्यालयाकडे आले होते. त्यावेळी राम गायकवाड यांनी त्यांना बोलावून बांधकाम कामगार कार्ड काढण्यासाठी तीन हजार रुपये लागतील असे सांगत आधार कार्ड व पॅन कार्डची मागणी केली.

जयशंकर कांबळे यांनी त्यावर अविश्वास व्यक्त करून नकार दिल्यानंतर राम गायकवाड संतप्त झाले आणि त्यांनी जयशंकर यांना कार्यालयात ओढून नेले. त्यानंतर फोनवरून शिवीगाळ झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पुढे वाद वाढल्यानंतर राम गायकवाड यांनी जयशंकर कांबळे यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेनंतर जयशंकर कांबळे बाहेर पळत आले आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रतिकार केला, असेही निवेदनात म्हटले आहे. त्या वेळी पंचशीला कांबळे व संघर्ष कांबळे हे घटनास्थळी उपस्थित नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

नंतर पंचशीला कांबळे यांनी राम गायकवाड यांना जाब विचारला असता त्यांनी दमदाटी केली, अश्लील भाषेत शिवीगाळ केली तसेच बदनामी करण्याची धमकी दिल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

तसेच, तहसीलदारांना दिलेल्या दुसऱ्या निवेदनात एका महाविद्यालयीन तरुणीचे नाव नमूद करून तिचीही बदनामी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या म्हणून आपली मानहानी आणि मानसिक छळ झाल्याचे सांगत पंचशीला कांबळे यांनी राम गायकवाड यांच्यावर महिलांच्या चारित्र्यहननासंदर्भातील कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

Ad 1
Tags: Ladlesab Nadaf
Previous Post

जवाहर पतसंस्थेतर्फे यशवंत गुणवंतांचा यथोचित सत्कार

Next Post

स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी; हायवेवरून चालत्या ट्रकमधून चोरी झालेल्या मेंढ्या २४ तासांत जप्त

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी; हायवेवरून चालत्या ट्रकमधून चोरी झालेल्या मेंढ्या २४ तासांत जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी; हायवेवरून चालत्या ट्रकमधून चोरी झालेल्या मेंढ्या २४ तासांत जप्त

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In