• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्री. योगेश्वरी मंदिरात ‘ज्ञानप्रसादालय’ ग्रंथालयाचे लोकार्पण

Rudra by Rudra
May 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
श्री. योगेश्वरी मंदिरात ‘ज्ञानप्रसादालय’ ग्रंथालयाचे लोकार्पण
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

“बुके नको, पुस्तक द्या” उपक्रमातून साकारला ज्ञानाचा अनोखा उपक्रम
अंबाजोगाई (प्रतिनिधी)

अंबाजोगाई “बुके नको, पुस्तक द्या” या अभिनव संकल्पनेतून अंबाजोगाई शहरात उभारण्यात आलेल्या ‘ज्ञानप्रसादालय’ या ग्रंथालयाचे उद्घाटन शनिवारी श्री. योगेश्वरी मंदिर परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. वाचन संस्कृती जपण्याचा आणि समाजात ज्ञानाचा प्रसार करण्याचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
अंबाजोगाई “पुस्तकांचं गाव” या संकल्पनेला बळ देत रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी आणि श्री. योगेश्वरी देवल कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम साकारण्यात आला. मंदिर परिसरात सुरू करण्यात आलेले हे ग्रंथालय भक्तांसाठी ज्ञानाचे नवे दालन ठरणार असून धार्मिक स्थळासोबतच बौद्धिक समृद्धीचे केंद्र म्हणूनही या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरीचे प्रांतपाल सुधीर लातुरे होते. उद्घाटक म्हणून देवल कमिटीचे सचिव गिरधारीलालजी भराडिया उपस्थित होते. यावेळी रोटरीचे उपप्रांतपाल प्रवीण देशपांडे, प्रांतसचिव डॉ. राजगोपाल तापडिया, देवल कमिटीचे विश्वस्त कमलाकर चौसाळकर, उल्हास पांडे, हंसराज देशमुख, प्रवीण दामा, पूजा कुलकर्णी, गौरी जोशी, रोटरी क्लबच्या अध्यक्षा प्रा. रोहिणी पाठक, सचिव मंजुषा जोशी, प्रकल्प प्रमुख अविनाश मुडेगावकर, सहप्रकल्प प्रमुख धनराज सोळंकी, सौ. संगीता लातुरे, शर्मिष्ठा देशपांडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना गिरधारीलाल भराडिया म्हणाले की, “मंदिरात येणाऱ्या भक्तांना आता महाप्रसादासोबत ज्ञानप्रसादही मिळणार आहे. हे ग्रंथालय अधिक सुसज्ज आणि अत्याधुनिक करण्यात येणार असून अंबाजोगाईतील विविध पर्यटन स्थळांची माहितीही येथे उपलब्ध करून दिली जाणार आहे.”

अध्यक्षीय समारोपात सुधीर लातुरे यांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. “वाचन संस्कृती टिकली तरच समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकतो. मंदिर परिसरात सुरू झालेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहे,” असे ते म्हणाले. यावेळी प्रवीण देशपांडे व प्रा. रोहिणी पाठक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
दीपप्रज्वलन आणि फित कापून ‘ज्ञानप्रसादालय’ ग्रंथालयाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख अविनाश मुडेगावकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेखा काळे आणि शिल्पा सेलुकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार धनराज सोळंकी यांनी मानले. या कार्यक्रमास महिला, विद्यार्थी, वाचनप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बुकेऐवजी पुस्तकांच्या भेटीतून उभे राहिले ज्ञानमंदिर
पत्रकार अविनाश मुडेगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या पुढाकारातून “बुके नको, बुक द्या” हा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि तब्बल एक हजार पुस्तके जमा झाली. या पुस्तकसंपदेचेच रूपांतर आता ‘ज्ञानप्रसादालय’ या सुंदर आणि उपयुक्त ग्रंथालयात झाले आहे.
समाजात वाचनाची आवड निर्माण करण्यासोबतच ज्ञानदानाची परंपरा जपणारा हा उपक्रम अंबाजोगाई शहरासाठी अभिमानाची बाब ठरत असून नागरिकांकडून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Ad 1
Previous Post

कमला एकादशी निमित्त असोला तर्फे औंढा नागनाथ येथे भव्य दिंडी मिरवणूक

Next Post

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी यासाठी , आयटकचे ८ जून पासुन नागपूरातील मुख्यमंत्री सचिवालयासमोर लक्षवेधी बेमुदत धरणे आंदोलन .

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी यासाठी , आयटकचे ८ जून पासुन नागपूरातील मुख्यमंत्री सचिवालयासमोर लक्षवेधी बेमुदत धरणे आंदोलन .

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In