• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अखिल भारतीय स्तरावर १६ वा क्रमांक; थोरातवाडीच्या सुपुत्राचा ऐतिहासिक मान

Rudra by Rudra
May 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
अखिल भारतीय स्तरावर १६ वा क्रमांक; थोरातवाडीच्या सुपुत्राचा ऐतिहासिक मान
0
SHARES
125
VIEWS
Ad 1
Ad 1

अखिल भारतीय स्तरावर १६ वा क्रमांक; थोरातवाडीच्या सुपुत्राचा ऐतिहासिक मान, इंदापूर तालुक्याचा उंचावला गौरव
ग्रामस्थांकडून जल्लोषात स्वागत व भव्य सत्कार सोहळा; युवकांसमोर नवा आदर्श निर्माण
सारथी महाराष्ट्राचा प्रतिनिधी शत्रुघ्न घाडगे | इंदापूर :
इंदापूर तालुक्यातील थोरातवाडी गावचे सुपुत्र ओंकार महेश पवार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन करत अखिल भारतीय स्तरावर १६ वा क्रमांक पटकावला असून, त्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे इंदापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ओंकार पवार यांच्या यशामुळे केवळ इंदापूर तालुकाच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्हा आणि महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव उंचावला आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

ग्रामीण भागातून कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर देशातील सर्वोच्च स्पर्धा परीक्षेत यश मिळवत ओंकार पवार यांनी युवकांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या यशानंतर थोरातवाडी, बेलवाडी आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ओंकार पवार यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण वालचंदनगर येथील भारत चिल्ड्रन्स अकॅडमी येथे झाले. त्यानंतर त्यांनी अकरावी-बारावीचे शिक्षण मालोजीराजे शेतकी महाविद्यालय, फलटण येथे पूर्ण केले. पुढे पुण्यातील कृषी महाविद्यालयातून पदवी शिक्षण घेत त्यांनी UPSC सारख्या देशातील सर्वोच्च परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले.

या यशानिमित्त बेलवाडी गावातून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच थोरातवाडी येथे सार्वजनिक सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भाऊसाहेब सपकाळ (माजी संचालक, श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर), करणसिंह घोलप (माजी सभापती, पंचायत समिती इंदापूर), शरद जामदार (संचालक, श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर), वसंतराव जगताप (ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – अजित पवार गट, इंदापूर), शहाजी शिंदे (माजी अध्यक्ष, दूधगंगा इंदापूर), सागर भिसे, दादासाहेब थोरात व केशवराव नगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून ओंकार पवार यांच्या संघर्षमय प्रवासाचे कौतुक करत, त्यांची जिद्द, परिश्रम आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.
“ग्रामीण मातीतून देशसेवेच्या सर्वोच्च शिखरावर झेप घेणाऱ्या ओंकार पवार यांनी इंदापूरच्या युवकांसाठी नवा आदर्श निर्माण केला असून, हे यश संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे,” अशा भावना ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आल्या.

Ad 1
Tags: Shatrughan Ghadge
Previous Post

पुणेनाशिक हायवेवर भीषण अपघात

Next Post

राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराने वाघमारे, राऊत, डॉ. चव्हाण सन्मानित

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराने वाघमारे, राऊत, डॉ. चव्हाण सन्मानित

राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराने वाघमारे, राऊत, डॉ. चव्हाण सन्मानित

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In