• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिर्डी येथे युवा क्रांती फाऊंडेशनचा भव्य मेळावा उत्साहात संपन्न

Rudra by Rudra
May 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
शिर्डी येथे युवा क्रांती फाऊंडेशनचा भव्य मेळावा उत्साहात संपन्न
0
SHARES
28
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधी — अमर पठारे

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

शिर्डी, दि. २१ मे २०२६ — युवा क्रांती फाऊंडेशन अंतर्गत पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेला भव्य मेळावा अत्यंत दिमाखदार आणि संस्मरणीय वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन, आकर्षक सजावट आणि प्रत्येक बाबीकडे बारकाईने दिलेले लक्ष यामुळे उपस्थित मान्यवर आणि सदस्य भारावून गेले.

“साधू-संत येती घरा, तोचि दिवाळी-दसरा” या उक्तीप्रमाणे कार्यक्रमाचे वातावरण मंगलमय आणि प्रेरणादायी होते. संघटनेच्या कार्यपद्धतीबाबत बोलताना रविंद्र सूर्यवंशी यांनी महिलांच्या सुरक्षेची ठाम भूमिका मांडली. संघटनेत कुठलाही वशिला चालत नसून केवळ कामाच्या जोरावर पद आणि सन्मान मिळतो, तसेच सर्व अधिकृत मान्यता प्राप्त झालेली भारतातील ही एकमेव संघटना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात गेल्या वर्षभरातील कार्याचा आढावा घेत महिला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा व मुंबई अध्यक्षा स्मिता बांदेकर यांचा शाल, ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन टाळ्यांच्या गजरात गौरव करण्यात आला. हा क्षण त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला.

राष्ट्रीय युवती अध्यक्षा जयश्री अहिरे यांनी महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत कार्यक्रमात नवचैतन्य निर्माण केले. राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र हेन्द्रे यांच्या प्रभावी सूत्रसंचालनामुळे संपूर्ण कार्यक्रम रंगतदार झाला.

यावेळी राष्ट्रीय सल्लागार दिनेश मेहता, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मधुकर अहिरे, महाराष्ट्र युवा अध्यक्ष शिवाजीराव शेलार तसेच राष्ट्रीय सचिव व मुंबई-ठाणे-पालघर प्रभारी राकेश वाघ यांची भाषणे विशेष लक्षवेधी ठरली.

“मुंबईचा मान, आमचा सन्मान” या भावनेतून राकेश वाघ यांच्या नेतृत्वाखाली मुंबई टीमने तब्बल २७ ट्रॉफी जिंकत विशेष गौरव मिळवला. मुंबई अध्यक्ष धनेश रामरख्याणी यांना मानाची पहिली ट्रॉफी प्रदान करण्यात आली, तर मुंबई युवा अध्यक्ष कुणाल शाह यांनी देखील मानाची ट्रॉफी पटकावली. त्यामुळे मुंबई टीमचा संपूर्ण महाराष्ट्रात गौरव करण्यात आला.

मुंबई महिला उपाध्यक्ष जसविंदर सिंग राणा यांची ठाणे जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांनाही ट्रॉफी प्रदान करण्यात आली.

संपूर्ण कार्यक्रमात विविध मान्यवर पदाधिकाऱ्यांचा शाल, ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. स्वादिष्ट नाश्ता व जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमातून उपस्थितांना अधिक जोमाने सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळाली.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक करत पुढील वर्धापन दिनानिमित्त आणखी उत्कृष्ट कार्य करून अधिक गौरव मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा तथा मुंबई महिला अध्यक्षा स्मिता बांदेकर व मुंबई टीमच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील युवा क्रांती टीमचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले तसेच “जय युवा क्रांती”च्या घोषणांनी संपूर्ण सभागृह दुमदुमून गेले.

Ad 1
Tags: Amar Pathare
Previous Post

कश्यपी धरणात काळाचा घाला; चिमुकल्याला वाचवताना पती-पत्नींसह चौघांचा मृत्यू

Next Post

शहाद्यात श्रीमद् भागवत कथा सप्ताहाची २८ मे रोजी महाप्रसादाने होणार सांगता.

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
शहाद्यात श्रीमद् भागवत कथा सप्ताहाची २८ मे रोजी महाप्रसादाने होणार सांगता.

शहाद्यात श्रीमद् भागवत कथा सप्ताहाची २८ मे रोजी महाप्रसादाने होणार सांगता.

ताज्या बातम्या

मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा

मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा

October 11, 2026
सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन निवाणे ग्रामस्थांची पायी दिंडी उत्साहात

सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन निवाणे ग्रामस्थांची पायी दिंडी उत्साहात

October 11, 2026
🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In