• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहाद्यात संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात साजरी; वधू-वर परिचय पीडीएफचे प्रकाशन.

Rudra by Rudra
May 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहाद्यात संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात साजरी; वधू-वर परिचय पीडीएफचे प्रकाशन.
0
SHARES
33
VIEWS
Ad 1

शहादा,दि.२६(का.प्र.)
शहादा शहरात २५ मे रोजी परम संत भीमा भोई यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहादा भोई पंचमंडळाच्या वतीने ‘संत भीमा भोई चौक’ येथे अत्यंत आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात जयंती उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी विविध सामाजिक उपक्रम आणि मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.
जयंतीच्या पावन पर्वावर चौकातील संत भीमा भोई यांच्या पहिल्या फलकाचे पूजन शहादा भोई पंच मंडळाचे अध्यक्ष संजय साठे यांच्या हस्ते पुष्पहार व श्रीफळ अर्पण करून करण्यात आले. तर दुसऱ्या फलकाचे प्रतिमा पूजन मंडळाचे उपाध्यक्ष उमाकांतभाऊ शिवदे यांच्या हस्ते झाले. तसेच, अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेचे कार्याध्यक्ष सुपडूभाऊ खेडकर यांच्या हस्ते तिसऱ्या फलकावर माल्यार्पण व श्रीफळ अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक जयवंतभाऊ मोरे यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी संत भीमा भोई यांच्या बालपणातील संघर्ष आणि त्यांच्या समाजोद्धारक कार्याविषयी सविस्तर मनोगत व्यक्त करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

नेण्याचे आवाहन केले.या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे, अखिल भारतीय भोई समाज वधू-वर परिचय कल्याणकारी मंचच्या वतीने तयार करण्यात आलेल्या वधू-वरांच्या माहितीच्या पीडीएफ पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते अत्यंत थाटात संपन्न झाला. या उपक्रमाचे समाज बांधवांकडून कौतुक होत आहे.या मंगलमयी कार्यक्रमाला शहादा भोई पंचमंडळाचे सचिव गुलाबराव सोनवणे, सहसचिव आर.डी. मोरे सर, राष्ट्रीय सदस्य जयंतीलालभाऊ खेडकर, माजी अध्यक्ष अशोकभाऊ शिवदे, वधू-वर परिचय मंचाचे संचालक महेंद्र खेडकर सर, सुरेशभाऊ मोरे, शांतीलाल साठे, मोहन मोरे सर, माजी युवा अध्यक्ष योगेशभाऊ खेडकर उपस्थित होते.
तसेच निवृत्त पीएसआय रामलाल साठे, निवृत्त पीएसआय पंडित वाडीले, निवृत्त पीएसआय मधुकर साठे, संतोषभाऊ शिंगणे, मोहन साठे, काशिनाथ खेडकर, संजय तावडे सर, नथ्थू मोरे सर, तमखाने सर, आधार मोरे सर, चुडामन सूर्यवंशी, सी.डी.खेडकर सर, वसंतभाऊ नुक्ते, राजा खेडकर सर, स्वप्निल मोरे, राकेश खेडकर यांसह भोई समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय खेडकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार गुलाबराव सोनवणे यांनी मानले.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

शहाद्यात श्रीमद् भागवत कथा सप्ताहाची २८ मे रोजी महाप्रसादाने होणार सांगता.

Next Post

घरगुती वीज ग्राहकांना सक्तीने वीज मीटर बसविणे तात्काळ थांबवा

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
7
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post
घरगुती वीज ग्राहकांना सक्तीने वीज मीटर बसविणे तात्काळ थांबवा

घरगुती वीज ग्राहकांना सक्तीने वीज मीटर बसविणे तात्काळ थांबवा

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In