• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पेट्रोल-डिझेल तुटवडा टाळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सतर्क

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा; ५२ पेट्रोलपंप सुरळीत सुरू

कृत्रिम टंचाई करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

कुडाळ | प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील एकूण ६० पेट्रोलपंपांपैकी ८ पेट्रोलपंपांवर इंधन उपलब्धतेसंदर्भात तात्पुरत्या अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी उर्वरित ५२ पेट्रोलपंप नियमितपणे सुरू असल्याची माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ६ पेट्रोलपंपांवर पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनांचा तात्पुरता तुटवडा निर्माण झाला आहे. तर उर्वरित २ पेट्रोलपंपांपैकी एका पंपावर फक्त पेट्रोल उपलब्ध असून डिझेल उपलब्ध नाही, तर दुसऱ्या पंपावर डिझेल उपलब्ध असून पेट्रोलचा साठा संपल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित कंपन्यांच्या विक्री प्रतिनिधी व डेपो व्यवस्थापकांनी माहिती देताना सांगितले की, ड्राय झालेल्या पेट्रोलपंपांसाठी टँकर लोड करण्यात आले असून उद्यापर्यंत परिस्थिती पूर्ववत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे किंवा अतिरिक्त इंधन साठवण्याचे कारण नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोलपंप सुरळीत सुरू असून संबंधित कंपन्यांच्या पुरवठ्यानुसार आणि डेपोमधील मागणीनुसार इंधन वितरण नियमितपणे सुरू असल्याचेही प्रशासनाने सांगितले. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने HPCL, IndianOil आणि Bharat Petroleum या कंपन्यांच्या डेपो व्यवस्थापक व विक्री प्रतिनिधींशी सातत्याने संपर्क ठेवला आहे.

याशिवाय, कृत्रिम दरवाढ, साठेबाजी किंवा इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी तालुकास्तरावर भरारी पथके सक्रिय करण्यात आली आहेत. पेट्रोलपंपांची तपासणी आणि छापेमारीचे आदेश देण्यात आले असून, कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळल्यास संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Ad 1
Previous Post

सिंधुदुर्ग जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे आवाहन

Next Post

JNPA Port मध्ये २८ मेपासून ‘काम बंद’ आंदोलन; आयात-निर्यात ठप्प होण्याची भीती

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
JNPA Port मध्ये २८ मेपासून ‘काम बंद’ आंदोलन; आयात-निर्यात ठप्प होण्याची भीती

JNPA Port मध्ये २८ मेपासून ‘काम बंद’ आंदोलन; आयात-निर्यात ठप्प होण्याची भीती

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In