• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सिंधुदुर्ग जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 27, 2026
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

सिंधुदुर्गनगरी | दि. २७ | जिमाका

आगामी खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतकऱ्यांना वेळेवर आणि मागणीनुसार खतांचा पुरवठा व्हावा यासाठी कृषि विभागाने व्यापक नियोजन केले असून जिल्ह्यात युरिया व संयुक्त खतांचा मुबलक साठा उपलब्ध असल्याची माहिती कृषि विभागाकडून देण्यात आली आहे.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

भात शेतीसह आंबा, काजू यांसारख्या फळबागांसाठी मोठ्या प्रमाणावर खतांची गरज भासणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा खतटंचाई निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने आगाऊ उपाययोजना केल्या आहेत. कृषि विभागाच्या माहितीनुसार, खरीप हंगाम २०२६ साठी जिल्ह्यास ५५०० मे. टन युरिया तसेच ५२०० मे. टन संयुक्त खतांचा साठा मंजूर करण्यात आला आहे.

त्यापैकी एप्रिल आणि मे महिन्यात आतापर्यंत २२७१.४ मे. टन युरिया व १२३८ मे. टन संयुक्त खतांचा पुरवठा करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात १९८६.७ मे. टन युरिया आणि २४५७.५ मे. टन संयुक्त खतांचा साठा उपलब्ध असून, याशिवाय ४५० मे. टन युरियाचा संरक्षित साठाही राखून ठेवण्यात आला आहे.

कृषि विभागाने सांगितले की, खरीप हंगामात विशेषतः भात शेती तसेच फळबागांसाठी रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढते. त्यामुळे खतांचा पुरवठा सुरळीत राहावा आणि शेतकऱ्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी विभाग सातत्याने पुरवठ्यावर लक्ष ठेवून आहे.

दरम्यान, केंद्र शासनाच्या निर्देशानुसार अनुदानित रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा टाळण्यासाठी खत विक्रेत्यांना POS मशीनद्वारे खत विक्री करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे खत विक्री प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी पुरेसा खत व बियाणे साठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे. तसेच खते व बियाणे खरेदी करताना अधिकृत व परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी, खरेदीचे पक्के बिल घ्यावे आणि बिलावरील लॉट नंबर तसेच किंमत तपासून घ्यावी, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Ad 1
Previous Post

अतिक्रमण हटविण्याऐवजी पुनर्वसनाचा मार्ग स्वीकारा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

Next Post

पेट्रोल-डिझेल तुटवडा टाळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सतर्क

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
8
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
12
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
10
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
34
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post

पेट्रोल-डिझेल तुटवडा टाळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सतर्क

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In