• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आंबेठाण परिसरात वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी; रस्ता दुरुस्तीसाठी वाहतूक वळविणार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 28, 2026
in Blog
0
0
SHARES
20
VIEWS
Ad 1
Ad 1

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी

आंबेठाण परिसरातील रस्ता दुरुस्ती आणि खड्डे बुजविण्याच्या कामासाठी पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेकडून तात्पुरती वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आंबेठाण येथील सा.क्र. ४/४७० ते ४/५७० या सुमारे १०० मीटर लांबीच्या भागात कॉंक्रिटीकरणाचे काम करण्यात येणार असल्याने वाहतूक वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

RelatedPosts

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, आंबेठाण हनुमान मंदिराच्या मागील रस्त्यावर वासुली फाटा ते बिरदवाडी फाटा दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. स्थानिक नागरिक तसेच लोकप्रतिनिधींकडून सातत्याने तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने ही कारवाई केली आहे.

संदिप आटोळे यांनी मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६ आणि ११७ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून तात्पुरते आदेश निर्गमित केले आहेत.

चाकण महाळुंगे वाहतूक बदलDownload

या मार्गावरील वाहतुकीस बंदी

महाळुंगे-चाकण वाहतूक विभागांतर्गत आंबेठाण हनुमान मंदिराच्या मागील रस्त्यावर वासुली फाटा ते बिरदवाडी फाटा दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस तात्पुरती मनाई करण्यात आली आहे.

पर्यायी मार्ग

  • तळेगाव बाजूकडून येणारी वाहने वासुली फाटा मार्गे एच.पी. चौकातून इच्छितस्थळी जातील.
  • भारत पेट्रोल पंप शेजारील चौक मार्गे महाळुंगे गाव वाय पॉईंटमार्गे वाहतूक वळविण्यात येईल.
  • आंबेगाव ते महाळुंगे गाव वाय पॉईंटमार्गे पर्यायी मार्ग उपलब्ध राहील.
  • चाकण/खेड बाजूकडून येणारी वाहने बिरदवाडी चौक मार्गे महाळुंगे गाव वाय पॉईंटमार्गे जातील.
  • काही वाहने बिरदवाडी चौक मार्गे चावडी चौकातून इच्छितस्थळी जाऊ शकतील.

जड वाहनांनाही बंदी

पुणे-नाशिक महामार्गावरील भाम फाटा आणि आंबेठाण चौक येथून बिरदवाडी फाट्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

या वाहनांसाठी पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण-तळेगाव चौकमार्गे पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

ही वाहतूक अधिसूचना दि. २८ मे २०२६ रोजी रात्री ९ वाजल्यापासून ते २९ मे २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार असून वाहनचालकांनी प्रशासनाला सहकार्य करत पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.

Ad 1
Previous Post

दुघळा येथील सय्यद मोबीन सय्यद वजीर यांची मुंबई शहर पोलीस पदासाठी निवड

Next Post

अवकाळी पावसाचा तडाखा : सेनगाव – नंदपा मार्गावर झाडे कोसळल्याने वाहतुकीला मोठा अडथळा

Related Posts

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
3
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
10
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
11
Blog

जळगावकरांसाठी विशेष कार्यक्रम खुला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.

October 10, 2026
1
सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
10
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
13
Next Post
अवकाळी पावसाचा तडाखा : सेनगाव – नंदपा मार्गावर झाडे कोसळल्याने वाहतुकीला मोठा अडथळा

अवकाळी पावसाचा तडाखा : सेनगाव – नंदपा मार्गावर झाडे कोसळल्याने वाहतुकीला मोठा अडथळा

ताज्या बातम्या

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In