• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बकरी ईद निमित्त कळमनुरी शहरात पोलिसांचे भव्य पथसंचलन

Rudra by Rudra
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
बकरी ईद निमित्त कळमनुरी शहरात पोलिसांचे भव्य पथसंचलन
0
SHARES
26
VIEWS
Ad 1
Ad 1

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क

कळमनुरी / सतीश पंडित

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कळमनुरी शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने कळमनुरी पोलिसांच्या वतीने भव्य पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

पोलीस अधीक्षक हिंगोली डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रेमकुमार माकोडे यांनी दि. २७ मे २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शहरातील मुख्य मिरवणूक मार्गावर या पथसंचलनाचे नेतृत्व केले.

या पथसंचलनाद्वारे पोलिस प्रशासनाकडून शांतता, सलोखा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला. शहरातील विविध भागातून कडक पोलिस बंदोबस्तात हे संचलन पार पडले. पोलिस दलाच्या शिस्तबद्ध मार्चमुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून सण उत्साहात आणि शांततेत साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

सदर पथसंचलनामध्ये पोलीस उपनिरीक्षक श्री. इंगळे, पोलीस उपनिरीक्षक श्री. ठेंगे यांच्यासह स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच एक एसआरपीएफ तुकडी, गृह रक्षक दलाचे तब्बल ४० पुरुष कर्मचारी आणि १५ महिला कर्मचारी यांचाही सहभाग होता.

शहरातील संवेदनशील भाग, मुख्य चौक तसेच गर्दीच्या परिसरातून हे संचलन काढण्यात आले. नागरिकांनीही पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत करत प्रशासनाच्या तयारीबद्दल समाधान व्यक्त केले.

दरम्यान, हे पथसंचलन यशस्वी करण्यासाठी गोपनीय शाखेचे श्री. होळकर यांनी विशेष परिश्रम घेतले. पोलिस प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राखण्याचे आवाहन केले आहे.

Ad 1
Tags: Satish Pandit
Previous Post

जालना जिल्ह्यातील तलाठ्यांना सजा (गावावर) थांबण्याचे प्रशासनाचे आदेश

Next Post

कनकदुर्ग परिसरातील वादानंतर हर्णेत दोन युवकांवर हल्ला; दापोलीत मध्यरात्रीपर्यंत आंदोलन

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post

कनकदुर्ग परिसरातील वादानंतर हर्णेत दोन युवकांवर हल्ला; दापोलीत मध्यरात्रीपर्यंत आंदोलन

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In