• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कनकदुर्ग परिसरातील वादानंतर हर्णेत दोन युवकांवर हल्ला; दापोलीत मध्यरात्रीपर्यंत आंदोलन

Rudra by Rudra
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
56
VIEWS
Ad 1
Ad 1

हर्णे / दापोली | प्रतिनिधी
दिनांक : २७ मे २०२६
दापोली तालुक्यातील हर्णे येथे दोन युवकांवर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्यानंतर हर्णे आणि दापोली परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. घटनेच्या निषेधार्थ दापोली शहरातील केळसकर नाका परिसरात नागरिकांनी उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन करत आरोपींवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, हर्णे येथील ऐतिहासिक कनकदुर्ग किल्ला परिसरात मंगळवारी रात्री काही युवक धूम्रपान व मद्यप्राशन करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. यावेळी स्थानिक युवक चिन्मय गुरव आणि महेंद्र रघुवीर यांनी त्यास विरोध केला. यावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला होता.
हा वाद पुढे वाढत बुधवारी सायंकाळी २५ ते ३० जणांच्या जमावाने चिन्मय गुरव आणि महेंद्र रघुवीर यांच्यावर अचानक हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दोघांवर उपचार सुरू; एकाची प्रकृती गंभीर
या मारहाणीत चिन्मय गुरव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे. तर महेंद्र रघुवीर यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

हर्णे आणि दापोलीत आंदोलन
घटनेनंतर हर्णे गावात नागरिकांनी हर्णे पोलीस स्टेशन परिसर आणि बायपास भागात ठिय्या आंदोलन सुरू केले. “मुख्य आरोपींना तात्काळ अटक करा,” अशी आक्रमक मागणी आंदोलकांनी केली.
दरम्यान, दापोली शहरातील केळसकर नाका परिसरातही मोठ्या संख्येने नागरिक एकत्र जमले होते. संबंधित आरोपींवर कठोर गुन्हे दाखल करून तातडीने कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला.

पोलिसांचा कडक बंदोबस्त
घटनेनंतर दापोली आणि हर्णे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस कुमकही मागविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. प्राथमिक माहितीनुसार काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या संपूर्ण दापोली तालुक्यात परिस्थिती संवेदनशील असून पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

Ad 1
Tags: Rakesh Chilabe
Previous Post

बकरी ईद निमित्त कळमनुरी शहरात पोलिसांचे भव्य पथसंचलन

Next Post

बार्शीटाकळी येथे ईद-उल-अजहा (बकरी ईद) उत्साहात साजरी!

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
बार्शीटाकळी येथे ईद-उल-अजहा (बकरी ईद) उत्साहात साजरी!

बार्शीटाकळी येथे ईद-उल-अजहा (बकरी ईद) उत्साहात साजरी!

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In