• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा शहरात वाहतूक पोलिसांच्या डोळ्यांसमोर नियमांची पायमल्ली, खाकीचा वचक संपला?

Rudra by Rudra
May 28, 2026
in Blog
0
शहादा शहरात वाहतूक पोलिसांच्या डोळ्यांसमोर नियमांची पायमल्ली, खाकीचा वचक संपला?
0
SHARES
59
VIEWS
Ad 1
Ad 1

शहादा,दि.२७ (प्रतिनिधी)
शहादा शहरातील वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून शहरातील मुख्य चौकांमध्ये तैनात असलेला पोलीस बंदोबस्त केवळ नावापुरताच उरल्याची संतप्त प्रतिक्रिया सुज्ञ नागरिकांमधून उमटत आहे. शहरातील गजबजलेल्या चौकांमध्ये पोलिसांच्या देखतच वाहतुकीच्या नियमांचे धिंडवडे निघत असून पोलीस मात्र मुक्या बहिऱ्याची भूमिका घेत असल्याने ‘खाकी’चा धाक उरला आहे की नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

RelatedPosts

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

याबाबत अधिक माहिती अशी,शहरातील अत्यंत वर्दळीच्या नगरपालिका चौकात सायंकाळच्या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असतो. मात्र असे असतानाही अनेक दुचाकी व चारचाकी वाहनधारक वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वन वे असूनही उलट दिशेने सर्रास वाहने चालवताना दिसतात. विशेष म्हणजे साधारणत: ८ ते १० पोलीस कर्मचारी या ठिकाणी हजर असतात. परंतु कारवाई करण्याऐवजी हे कर्मचारी एकमेकांशी गप्पा मारण्यात किंवा मोबाईलवर बोलण्यातच मग्न असतात. त्यांच्या डोळ्यादेखत हा सगळा प्रकार सुरू असतानाही ते केवळ ‘बघ्याची’ भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.नगरपालिका चौकासह शहरातील प्रमुख रस्त्यांवर हातगाडी धारकांनीही मोठ्या प्रमाणावर व्यवसाय थाटला आहे. रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्याच्या पुढे येऊन या हातगाड्या लावल्या जात असल्यामुळे आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. या वाहतूक कोंडीत सामान्य नागरिक, महिला आणि रुग्णवाहिका अडकून पडतात, मात्र रस्त्यावर उभे असलेले पोलीस याकडे पूर्णपणे कानाडोळा करतात.शहरातील गजबजलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा चौक, महात्मा गांधी पुतळा चौक, नगरपालिका चौक, आणि खेतिया रस्ता चौफुली या प्रमुख ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात केलेला असतो.

मात्र, या बंदोबस्ताचा वाहतूक नियंत्रणासाठी काडीचाही उपयोग होत नसल्याने हा बंदोबस्त ‘बिनकामाचा’ ठरत आहे. पोलिसांच्या या ढिसाळ कारभारामुळे शहरात दररोज वाहतुकीचा मोठा खेळखंडोबा पाहायला मिळत आहे.शहादा शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक शिस्त राखण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेणे आता अनिवार्य झाले आहे. नियमांची पायमल्ली करणाऱ्या बेजबाबदार वाहनधारकांवर आणि अतिक्रमणावर पोलिसांचा वचक असणे गरजेचे आहे. शहाद्याची सद्यस्थिती पाहता पोलिसांचा धाक संपल्याचे चित्र आहे. हे चित्र तातडीने बदलण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया सुज्ञ शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.शहरातील या गंभीर परिस्थितीकडे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांनी तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. गप्पा मारण्यात व्यस्त राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कडक सूचना देऊन, नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाईल का? की शहादाकर असेच वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकलेले राहतील? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ad 1
Tags: Netradipak Kuwar
Previous Post

विविध गावांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची मागणी.

Next Post

मोहिदे त.ह. गावात कृषीदूतांचे उत्साहात आगमन; आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करणार.

Related Posts

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
3
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
10
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
11
Blog

जळगावकरांसाठी विशेष कार्यक्रम खुला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.

October 10, 2026
1
सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
10
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
13
Next Post
मोहिदे त.ह. गावात कृषीदूतांचे उत्साहात आगमन; आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करणार.

मोहिदे त.ह. गावात कृषीदूतांचे उत्साहात आगमन; आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करणार.

ताज्या बातम्या

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In