• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भूमिपुत्रांना नोकरी, बाजारभावाने भरपाई व पुनर्वसनासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

Rudra by Rudra
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
भूमिपुत्रांना नोकरी, बाजारभावाने भरपाई व पुनर्वसनासाठी शेतकऱ्यांचा एल्गार
0
SHARES
35
VIEWS
Ad 1
Ad 1

अहिल्यानगर | प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील पांढरीपुल येथील औद्योगिक वसाहतीसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या प्रश्नावरून एमआयडीसीग्रस्त शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून शासनाने तातडीने न्याय द्यावा, अन्यथा संविधानिक मार्गाचा अवलंब करून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देत शेतकरी संघर्ष समितीने नागापूर येथील एमआयडीसी ऑफिससमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. यासंदर्भातील सविस्तर निवेदन यापूर्वीच शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींना देण्यात आले होते.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

सदर निवेदनानुसार नेवासा तालुक्यातील पांढरीपुल औद्योगिक वसाहतीसाठी शिंगणापूर परिसरातील जवळपास १६० शेतकऱ्यांच्या सुमारे २५४ हेक्टर सुपीक जमिनी १९९० ते १९९७ या कालावधीत संपादित करण्यात आल्या होत्या. औद्योगिक विकासाच्या नावाखाली जमिनी घेताना शासनाकडून अनेक आश्वासने देण्यात आली होती. मात्र, तीन दशकांनंतरही बहुतांश आश्वासने कागदावरच राहिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
औद्योगिक वसाहतीत उद्योग सुरू झाले असले तरी जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांना ना पुरेशी नुकसानभरपाई मिळाली, ना रोजगार, अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जमिनी संपादित करताना कुटुंबातील सदस्यांना नोकरी, व्यवसायासाठी जागा आणि पुनर्वसनाचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु शासनाने त्याची अंमलबजावणी केली नाही.
यामुळे अनेक शेतकरी कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले असून, उपजीविकेचे साधन हिरावल्याने अनेक कुटुंबे उदरनिर्वाहाच्या समस्येला सामोरे जात आहेत. सामाजिक व आर्थिक स्तर घसरल्याने तरुणांच्या भवितव्यावरही परिणाम झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या उद्योगांमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकरी दिली जात नसल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्याऐवजी परगावातील व परराज्यातील लोकांना रोजगार दिला जात असल्याने भूमिपुत्रांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यासंदर्भात अनेक वेळा उद्योग प्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही उद्योजकांकडून गुंडांच्या माध्यमातून दबाव आणला जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या प्रश्नासाठी यापूर्वीही शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर तसेच एमआयडीसी गेटसमोर उपोषण केले होते. मात्र, प्रशासनाकडून केवळ लेखी आश्वासने देण्यात आली, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही, असा आरोप आंदोलकांनी केला आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अधिकाऱ्यांनी दिलेली आश्वासने एमआयडीसीतील कंपन्यांनी नाकारल्याने प्रकल्पग्रस्तांना अद्याप न्याय मिळालेला नाही.

पांढरीपुल एमआयडीसीमधील प्लॉट विक्रीतील कथित गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. इतर प्रकल्पांप्रमाणेच प्रति एकर ५० लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाई द्यावी.
जमीन दिलेल्या प्रकल्पग्रस्तांना औद्योगिक क्षेत्रात व्यवसायासाठी मोफत जागा द्यावी.
प्रकल्पग्रस्तांना तात्काळ कायमस्वरूपी नोकरी द्यावी.
प्रत्येक बाधित शेतकरी कुटुंबातील किमान एका सदस्याला एमआयडीसीत रोजगार द्यावा.
नुकसानभरपाईची रक्कम व्याजासह अदा करावी. प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना शासकीय सेवेत आरक्षण मिळावे.
शालेय व महाविद्यालयीन शिक्षण मोफत द्यावे. अशा काही प्रमुख मागण्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या आहेत.

शासनाला यापूर्वी नोटीस देऊनही कोणताही निर्णय न झाल्याने आता आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीस शासन व प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती उद्योगमंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.

Ad 1
Previous Post

वडगाव कांदळी येथे बकरी ईद उत्साहात साजरी; हिंदू-मुस्लिम बांधवांनी जपला बंधुभाव

Next Post

कोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘भीम जयंती’ चित्रपटाला ‘बेस्ट सोशल फिल्म’ पुरस्कार

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
2
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
2
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
5
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
कोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘भीम जयंती’ चित्रपटाला ‘बेस्ट सोशल फिल्म’ पुरस्कार

कोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘भीम जयंती’ चित्रपटाला ‘बेस्ट सोशल फिल्म’ पुरस्कार

ताज्या बातम्या

कोटमगावच्या जगदंबा माता यात्रेत यंदा विशेष कृषी प्रदर्शनाचे आकर्षण

कोटमगावच्या जगदंबा माता यात्रेत यंदा विशेष कृषी प्रदर्शनाचे आकर्षण

October 11, 2026

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026

पंगव्हाण फाटा–निंभोरा रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधण्याची मागणी

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In