• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“अ ग्लिम्पस ऑफ डीव्हीनिटी” परिवारातर्फे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य व सायकल वाटप

Rudra by Rudra
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
“अ ग्लिम्पस ऑफ डीव्हीनिटी” परिवारातर्फे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य व सायकल वाटप
0
SHARES
10
VIEWS
Ad 1
Ad 1

पत्रकार कैलासराजे घरत
खारपाडा पेण
“अ ग्लिम्पस ऑफ डीव्हीनिटी” स्वामी समर्थ परिवार व युवा फ्रेंड्स सर्कल फाउंडेशन यांच्या तर्फे खैरासवाडी, निफाडवाडी अंगणवाडी, निफाडवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य, सायकल वाटप संपन्न..!
श्री स्वामी समर्थ विश्व कल्याण केंद्र आपटा फाटा यांच्या माध्यमातून सन्माननीय ओमप्रकाश परांजपे सर यांच्या मार्गदर्शनाखाली
“अ ग्लिम्पस ऑफ डीव्हीनिटी” स्वामी समर्थ परिवार व युवा फ्रेंड्स सर्कल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खैरासवाडी अंगणवाडी, निफाडवाडी अंगणवाडी, रा.जि.प.निफाडवाडी शाळेतील मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप, गरीब मुलींना सायकल वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल


कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक आणि नियोजक: महात्मा ज्योतिबा फुले नॅशनल फेलोशिप पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत
खैरासवाडी अंगणवाडी स्कूल किट वाटप कार्यक्रम :-
खैरासवाडी अंगणवाडीमधील मुलांना 10 स्कूल बॅग किट वाटप करण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका सौ.अरुणा गावडे, स्थानिक ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र कातकरी, ग्रामस्थ महिला विद्यार्थी उपस्थित होते. रायगड लोकधारा न्यूज चॅनलचे संपादक सन्मानिय विजय गायकर साहेब, महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे घरत आणि “अ ग्लिम्पस ऑफ डीव्हीनिटी” स्वामी समर्थ परिवार सदस्य यांच्या हस्ते अंगणवाडीतील 10 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग किट वाटप करण्यात आले.
निफाडवाडी अंगणवाडी खेळणी, रेनकोट, शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम:-
निफाडवाडी अंगणवाडीतील मुलांसाठी शैक्षणिक साहित्य 30 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 4 वह्यांचा एक सेट देण्यात, खेळणी, मूल्यांक पुस्तके, एबीसीडी पाट्या, बाहुल्या व 30 रेनकोट वाटप, खाऊ वाटप करण्यात आला.
*सायकल वाटप कार्यक्रम: निफाडवाडीतील 1)कु.ज्योती गणेश दरवडा 2)कु.करुणा प्रमोद लेंडे 3)कु. मंजुळा विठोबा पारधी या गरीब गरजू मुलींना सायकल वाटप करण्यात आल्या.


*स्वामीं समर्थांची आरती आणि स्वागत समारंभ:
उपस्थित पाहुण्यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थांचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर स्वामी समर्थांची आरती घेण्यात आली. आरती घेतल्यानंतर आणलेल्या सर्व वस्तूंचे पाहुण्यांचे हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले
निफाडवाडी शाळेसाठी प्रिंटर, शैक्षणिक साहित्य वाटप:
निफाडवाडी शाळेसाठी प्रिंटर देण्यात आला. शैक्षणिक साहित्य 30 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 4 वह्यांचा एक सेट देण्यात, 30 रेनकोट वाटप करण्यात आले.


प्रमुख सन्माननीय अतिथी आणि मान्यवर: या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड लोकधारा न्यूजचे संपादक पत्रकार श्री विजयजी गायकर सर, सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे घरत, रेखा साळी मॅडम, डॉली अय्यम मॅडम, राजू रजनी, किरण पुजारी, व्यवस्थापक प्रदीप मोहिते, सामाजिक कार्यकर्ते नितेश पाटील, सामाजिक कार्यकर्त्या रोहिणी ठाकूर, तंटामुक्ती अध्यक्ष बामा रामा पारधी तसेच निफाडवाडीचे सर्व ग्रामस्थ, महिला, तरुण वर्ग, पालक वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदिवासी मुलांच्या उत्कर्षासाठी शैक्षणिक प्रगतीसाठी स्तुत्य उपक्रम:
या स्तुत्य उपक्रमामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण झाला होता. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे घरत यांचे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, विकासासाठी मोठे योगदान:
आपले मनोगत व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे घरत म्हणाले की आमच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या शैक्षणिक साहित्याची नक्कीच मदत होईल, आदिवासी मुले सुशिक्षित झाली पाहिजेत, व्यसनमुक्ती, बालविवाह प्रतिबंध, नशामुक्ती सदैव आपण प्रयत्नशील असून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत, मूलभूत सुख सोयींपासून आदिवासी समाज विन्मुख आहे. त्यांना त्या मिळाल्या पाहिजेत यासाठी आपण सतत प्रयत्न करत आहोत.
उत्तम सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन :
या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन निफाडवाडी शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील सर यांनी केले होते. हा कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी शिक्षक निलेश रामदास कोळी,
निफाडवाडी ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पडला. सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करून या कार्यक्रमाची गोड सांगता झाली.

Ad 1
Tags: Kailas Gharat
Previous Post

गो. से. महाविद्यालयाच्या NCC कॅडेट्सचे घवघवीत यश; सैन्य व पोलीस दलात निवड

Next Post

चापानेर शिवारातून ७० क्विंटल कांदा लंपास; कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
2
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
2
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
5
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
चापानेर शिवारातून ७० क्विंटल कांदा लंपास; कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

चापानेर शिवारातून ७० क्विंटल कांदा लंपास; कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

कोटमगावच्या जगदंबा माता यात्रेत यंदा विशेष कृषी प्रदर्शनाचे आकर्षण

कोटमगावच्या जगदंबा माता यात्रेत यंदा विशेष कृषी प्रदर्शनाचे आकर्षण

October 11, 2026

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026

पंगव्हाण फाटा–निंभोरा रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधण्याची मागणी

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In