• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रामदास शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोलीत भव्य रोजगार मेळावा; शेकडो युवकांना नोकरीची संधी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 31, 2026
in Blog
0
रामदास शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोलीत भव्य रोजगार मेळावा; शेकडो युवकांना नोकरीची संधी
0
SHARES
104
VIEWS
Ad 1
Ad 1

पनवेल | कळंबोली | प्रतिनिधी :

शिवसेना पनवेल जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक Ramdas Shewale रामदास शेवाळे यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त रविवारी (दि. ३१ मे) सेक्टर-१, कळंबोली येथील नवीन सुधागड शाळेत भव्य रोजगार मेळावा आणि मोफत कौशल्यविकास अभ्यासक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

मेळाव्याचे उद्घाटन Prashant Thakur आमदार प्रशांत ठाकूर आणि Nitin Patil महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती बबन मुकादम, नगरसेवक रवी भगत, नगरसेविका सायली सरक, शहराध्यक्ष तुकाराम सरक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

१०० हून अधिक कंपन्यांचा सहभाग

या रोजगार मेळाव्यात १०० हून अधिक नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला. रोजगाराच्या शोधात असलेल्या हजारो युवक-युवतींनी सकाळपासूनच मेळाव्याच्या ठिकाणी गर्दी केली. विविध कंपन्यांकडून थेट मुलाखती घेण्यात आल्या असून शेकडो युवकांची विविध पदांसाठी निवड करण्यात आली.

याशिवाय, तरुणांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी विविध मोफत कोर्सेस, कौशल्यविकास प्रशिक्षण आणि करिअर मार्गदर्शनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.

कार्यक्रमाला माजी सभागृह नेते Paresh Thakur परेश ठाकूर यांच्यासह अनेक नगरसेवकांनी भेट दिली. तसेच पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते Arvind Mhatre अरविंद म्हात्रे यांनी उपस्थित राहून रामदास शेवाळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन रामदास शेवाळे यांचे सुपुत्र तन्मय रामदास शेवाळे यांनी केले होते. हजारो युवकांची उपस्थिती असूनही मेळावा अत्यंत शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडला.

वाढदिवसानिमित्त केवळ औपचारिक कार्यक्रम न करता युवकांच्या रोजगारासाठी प्रत्यक्ष संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम पनवेल आणि कळंबोली परिसरात विशेष कौतुकास पात्र ठरत आहे. रोजगाराभिमुख आणि समाजोपयोगी उपक्रमामुळे रामदास शेवाळे यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.

Ad 1
Previous Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त ..

Next Post

झारगडवाडीत राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी; गुणवंत विद्यार्थी व पोलिस भरती कन्येचा सत्कार

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
24
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
10
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
9
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
33
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post
झारगडवाडीत राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी; गुणवंत विद्यार्थी व पोलिस भरती कन्येचा सत्कार

झारगडवाडीत राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी; गुणवंत विद्यार्थी व पोलिस भरती कन्येचा सत्कार

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In