• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अलनिनोच्या धोक्यामुळे पिकविमा योजनेत नुकसान भरपाई देताना पूर्वीप्रमाणे ट्रिगर लागू करा – आमदार कैलास पाटील

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
अलनिनोच्या धोक्यामुळे पिकविमा योजनेत नुकसान भरपाई देताना पूर्वीप्रमाणे ट्रिगर लागू करा – आमदार कैलास पाटील
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

धाराशिव ता. 31: चालू हंगामात अलनिनोच्या प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या दुष्काळजन्य परिस्थिती, प्रतिकूल हवामान, कमी पाऊस, अवकाळी पाऊस, दुष्काळ अथवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना वेळेत व योग्य नुकसान भरपाई मिळण्यासाठी ट्रिगर व्यवस्था अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे पूर्वीची असलेले ट्रिगर पुन्हा एकदा लागू करणे गरजेचे आहे अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल


निवेदनात म्हटले आहे की, मराठवाडा विभागातील पर्जन्यमान अनियमित व अनिश्चित स्वरूपाचे असून, धाराशिव जिल्ह्याचा मागील पंधरा वर्षांचा अनुभव विचारात घेतल्यास पेरणी कालावधीत अनेकदा पावसाचा मोठा खंड पडणे किंवा काही ठिकाणी अतिवृष्टी होणे अशी परिस्थिती निर्माण होते. परिणामी, वेळेवर पेरणी होऊ शकत नाही किंवा पेरणी झाल्यानंतर बियाण्यांची उगवण कमी प्रमाणात होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा आर्थिक भार सहन करावा लागतो. तसेच सोयाबीन पिकाचा फुलोरा व दाणे भरण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या अवस्थेत आवश्यकतेनुसार पाऊस न झाल्यास शेंगांचे प्रमाण कमी होते व उत्पादनात मोठी घट येते. याउलट, या कालावधीत अतिवृष्टी झाल्यास रोगराई व किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढून पिकांचे नुकसान होते. अशा परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढत असून उत्पादन खर्चही वाया जातो. राज्यामध्ये यंदा अलनिनो च्या प्रभावामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

हवामान विभागाने देखील यावर्षी पावसाचा अंदाज कमी असल्याचे सांगितले आहे. अशा परिस्थितीत कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भाग हा मान्सून कोअर झोनमध्ये येतो. हाच झोन देशातील कोरडवाहू शेतीचा मुख्य कणा आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या कोअर झोन मध्ये कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. परिणामी विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागासह संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पेरणी अयशस्वी होणे (Prevented Sowing), मध्य हंगामातील प्रतिकूल हवामानामुळे होणारे नुकसान (Mid-Season Adversity) तसेच काढणीपूर्व व काढणीनंतर होणारे नुकसान (Localized Calamities/Post-Harvest Losses) यासाठी स्पष्ट व प्रभावी ट्रिगर निश्चित करण्यात आलेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत व योग्य नुकसानभरपाई मिळू शकत होती. हवामानातील अनिश्चिततेमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळून त्यांच्या उत्पन्नात स्थैर्य निर्माण होण्यास मदत होत होती. राज्य शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत पूर्वीप्रमाणे लागू असलेले महत्त्वाचे “ट्रिगर” निकष पुन्हा लागू करण्यास नकार दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे.


चालू हंगामात मागील वर्षाप्रमाणेच (ट्रिगर न लावता) पीकविमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला जात असून नव्याने निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये पिकांचे संरक्षण करुनही फक्त ट्रिगर नसल्याने शेतकऱ्यांना दुष्काळजन्य परिस्थितीत नुकसान भरपाई मिळणार नाही त्यामुळे पूर्वीप्रमाणे ट्रिगर प्रणाली समाविष्ट करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग सुकर करणे आवश्यक आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून प्रधानमंत्री पिकविमा योजनेतील नुकसान भरपाईमध्ये पूर्वीप्रमाणे ट्रिगर लागू करण्याबाबत आपल्या स्तरावरून तात्काळ योग्य ते आदेश देण्यात यावेत. अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी सरकारकडे केली आहे.

Ad 1
Tags: Ladlesab Nadaf
Previous Post

हाळोली फाट्याजवळ भीषण अपघात; भरधाव चारचाकीची धडक, चार जण जखमी

Next Post

त्रिकोळी ग्रामपंचायत मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
30
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
त्रिकोळी ग्रामपंचायत मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

त्रिकोळी ग्रामपंचायत मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In