• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रशासकीय मनमानीला चाप विभागीय आयुक्तांकडून किनवट उपविभागीय अधिकारी चा हद्दपारीचा तो आदेश रद्द.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 1, 2026
in Blog
0
0
SHARES
14
VIEWS
Ad 1
Ad 1

नांदेड जिल्ह्यातील किनवट स्थानिक उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडून कायदेशीर बाबींचा सारासार विचार न करता यांत्रिक पद्धतीने आणि मनमानीपणे काढण्यात आलेला हद्दपारीचा आदेश छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांनी पूर्णपणे रद्द केला आहे. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला असून, या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर पोलिसांच्या प्रस्तावाच्या आधारे महसूल प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या घाईघाईच्या कारवाईला मोठा चपराक बसली आहे.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

या बाबद अधिक वृत्त असे की,
किनवट येथील रहिवासी अमरदीप गोपिनाथ कदम यांच्याविरुद्ध किनवट पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2016 ते 2024 या कालावधीत दाखल असलेल्या 4 गुन्ह्यांचा आधार घेत, उपविभागीय दंडाधिकारी किनवट यांनी 13 जानेवारी 2026 रोजी एक आदेश जारी केला होता. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 अन्वये काढलेल्या या आदेशानुसार, अमरदीप कदम यांना नांदेड आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांतून 9 महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले होते.
या अन्यायकारक आदेशाविरोधात अमरदीप कदम यांनी आपल्या वकिल श्री. व्यारकादास भांगे यांचेमार्फत विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्या न्यायालयात कलम 60 अन्वये अपील दाखल केले होते.
अपिलाची संपूर्ण कागदपत्रे, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पोलीस अभिलेखांची पडताळणी केल्यानंतर विभागीय आयुक्तांनी किनवट उपविभागीय अधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या कारवाईतील गंभीर त्रुटींवर बोट ठेवले
गुन्ह्यांमध्ये लाईव्ह लिंकचा अभाव असल्यानेअपीलकर्त्यावर 2016 ते 2024 दरम्यान गुन्हे दाखल असले, तरी त्यामध्ये आणि हद्दपारीच्या कारवाईत कोणताही तात्कालिक व निकट संबंध दिसून येत नाही. जुन्या गुन्ह्यांचा आधार घेऊन 2026 मध्ये हद्दपार करण्याची गरज सिद्ध होत नाही.पोलिसांनी ज्या 4 गुन्ह्यांचा उल्लेख केला होता, त्यापैकी 3 गुन्ह्यांमध्ये अपीलकर्त्याची न्यायालयाने आधीच निर्दोष मुक्तता केली आहे. केवळ दोनच गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत. गुन्हे केवळ किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीत नोंदवलेले असताना, थेट नांदेड आणि यवतमाळ या संपूर्ण दोन जिल्ह्यांतून हद्दपार करण्याचा आदेश अत्यंत अतिरिक्त आणि विनाकारण मोठा होता.

आदेशात एवढ्या विस्तृत क्षेत्रावरून हद्दपार करण्यासाठी कोणतीही ठोस व स्पष्ट कारणे नमूद करण्यात आली नव्हती.हद्दपारीची नोटीस बजावताना आणि सुनावणी घेताना अपीलकर्त्याला तिच्याविरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांचे सर्वसाधारण स्वरूप स्पष्ट करून बाजू मांडण्याची पुरेशी आणि वाजवी संधी देण्यात आली नव्हती, ज्यामुळे नैसर्गिक न्याय तत्त्वाचा भंग झाला. असे नमूद करतअपीलकर्त्याचे वय, सामाजिक-आर्थिक स्थिती आणि गुन्ह्यांचे स्वरूप पाहता 9 महिने आणि दोन जिल्ह्यांची हद्दपारी अत्यंत कठोर आणि मनमानी स्वरूपाची असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला.
विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी 15 एप्रिल 2026 रोजी अंतिम आदेश पारित करत:अमरदीप कदम यांचे अपील मंजूर केले.उपविभागीय दंडाधिकारी, किनवट यांचा 13 जानेवारी 2026चा हद्दपारीचा आदेश रद्द केला.
प्रशासनाने कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर करून घेतलेला निर्णय वरिष्ठ न्यायालयाने मोडीत काढल्याने, हा निकाल सध्या तालुक्यात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

Ad 1
Previous Post

बहुजन मुक्ती पार्टीचे कळवा-मुंब्रा-दिवा प्रभारी रमेश तांबे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Next Post

युवा क्रांती पोलिस मित्र फाऊंडेशनच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा सत्कार; नव्या नियुक्त्यांची घोषणा

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post
युवा क्रांती पोलिस मित्र फाऊंडेशनच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा सत्कार; नव्या नियुक्त्यांची घोषणा

युवा क्रांती पोलिस मित्र फाऊंडेशनच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा सत्कार; नव्या नियुक्त्यांची घोषणा

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In