• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खंडाळ्यात मुलाकडून वडिलांचा खून; आरोपी पुत्र पोलिसांच्या ताब्यात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 4, 2026
in Blog
0
खंडाळ्यात मुलाकडून वडिलांचा खून; आरोपी पुत्र पोलिसांच्या ताब्यात
0
SHARES
32
VIEWS
Ad 1

श्रीरामपूर | प्रतिनिधी

श्रीरामपूर तालुक्यातील बाभळेश्वर रोडवरील खंडाळा गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, मुलानेच आपल्या वडिलांचा खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शेतकरी सचिन प्रभाकर ढोकचोळे (वय ५५) यांचा त्यांच्याच सख्ख्या मुलाने कुदळीने वार करून खून केल्याची घटना बुधवारी (दि. ३ जून) पहाटे घडली.

RelatedPosts

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

मिळालेल्या माहितीनुसार, प्रणव सचिन ढोकचोळे (वय २५) याने घरातच वडिलांच्या डोक्यात कुदळीने वार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सचिन ढोकचोळे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत आरोपी प्रणव ढोकचोळे याला ताब्यात घेतले आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

खून नेमका कोणत्या कारणातून झाला, याचा तपास पोलीस करीत आहेत. घरगुती वादातून ही घटना घडली की यामागे अन्य काही कारण आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. गावात आरोपी मानसिक आजाराने ग्रस्त असल्याची चर्चा असली तरी त्याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

मुलानेच वडिलांचा खून केल्याच्या या घटनेमुळे खंडाळा गावासह संपूर्ण श्रीरामपूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

देशी कट्टे बनविणाऱ्या आरोपीला बेड्या; शस्त्रनिर्मितीचे साहित्य जप्त

Next Post

शेतरस्त्यांच्या प्रश्नावर शासनाला इशारा; ‘मिशन झिरो पेंडन्सी’ची मागणी

Related Posts

Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
170
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
34
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
44
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
11
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
93
Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
18
Next Post
शेतरस्त्यांच्या प्रश्नावर शासनाला इशारा; ‘मिशन झिरो पेंडन्सी’ची मागणी

शेतरस्त्यांच्या प्रश्नावर शासनाला इशारा; 'मिशन झिरो पेंडन्सी'ची मागणी

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In