• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सबजेलमध्ये दाखल करण्यापूर्वी पसार झालेला आरोपी यवत पोलिसांकडून जेरबंद

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 4, 2026
in Blog
0
सबजेलमध्ये दाखल करण्यापूर्वी पसार झालेला आरोपी यवत पोलिसांकडून जेरबंद
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

दौंड-यवत | प्रतिनिधी

यवत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आरोपी दौंड उपकारागृहात दाखल करण्यापूर्वी पोलिसांच्या ताब्यातून पसार झाला होता. मात्र, यवत पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवत आंध्रप्रदेशातील त्याच्या मूळ गावी जाऊन आरोपीला पुन्हा ताब्यात घेण्यात यश मिळविले.

RelatedPosts

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

यवत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४९७/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये दाखल गुन्ह्यात व्यंकटेश नान तरपतैया (वय ३०, रा. येल्लूर, विजयवाडा, आंध्रप्रदेश) याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला १ जून रोजी अटक करण्यात आली होती.

अटकेनंतर आरोपीला दौंड उपकारागृहात दाखल करण्यासाठी पोलीस हवालदार विकास कापरे आणि पोलीस कॉन्स्टेबल किरण तुपे हे घेऊन जात होते. दौंड येथे पोहोचल्यानंतर आवश्यक वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत काढण्यासाठी वाहन थांबविण्यात आले. यावेळी पोलीस हवालदार विकास कापरे झेरॉक्स काढण्यासाठी खाली उतरले असता आरोपीने वाहनाचा दरवाजा उघडून अचानक पळ काढला.

पोलीस कॉन्स्टेबल किरण तुपे यांनी आरोपीचा पाठलाग करून त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने त्यांना धक्का देऊन खाली पाडले आणि घटनास्थळावरून पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच यवत व दौंड पोलिसांनी संयुक्तरीत्या विशेष शोधमोहीम हाती घेतली. आरोपीच्या संभाव्य ठिकाणांची पडताळणी करण्यात आली तसेच त्याच्या मूळ गावीही विशेष पथके रवाना करण्यात आली.

अखेर ३ जून रोजी आंध्रप्रदेशातील येल्लूर (विजयवाडा) येथे आरोपीचा शोध घेऊन त्याला पुन्हा ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ही कारवाई संदीपसिंह गिल, गणेश बिरादार आणि बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

आरोपीच्या अटकेमुळे यवत पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत असून, फरार आरोपीचा अल्पावधीत शोध घेऊन त्याला पुन्हा जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Previous Post

रावेर शहरात दररोज साफसफाई करा; पावसाळ्यापूर्वी स्वच्छता अभियान राबवा – युवासेनेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी शिक्षणमंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन; राजकीय क्षेत्रात शोककळा

Related Posts

Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
171
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
34
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
45
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
11
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
93
Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
18
Next Post
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी शिक्षणमंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन; राजकीय क्षेत्रात शोककळा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी शिक्षणमंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन; राजकीय क्षेत्रात शोककळा

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In