• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रावेर शहरात दररोज साफसफाई करा; पावसाळ्यापूर्वी स्वच्छता अभियान राबवा – युवासेनेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 4, 2026
in Blog
0
रावेर शहरात दररोज साफसफाई करा; पावसाळ्यापूर्वी स्वच्छता अभियान राबवा – युवासेनेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

रावेर | प्रतिनिधी

रावेर शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांच्या कडेला, सार्वजनिक ठिकाणी तसेच गल्लीबोळांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला असून तो अनेक दिवसांपासून उचलला जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून शहरात दररोज नियमित साफसफाई करण्यात यावी, या मागणीसाठी युवासेनेच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

युवासेना शहर प्रमुख निलेश महाजन यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात पावसाळ्यापूर्वी व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच काही ठिकाणी साफसफाईचे काम अपुरे होत असतानाही संबंधित मक्तेदारांकडून बिले काढून घेतली जात असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे शहरात समाधानकारक स्वच्छता होईपर्यंत मक्तेदारांची बिले मंजूर करू नयेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.

निवेदनाद्वारे नगरपालिका हद्दीतील सर्व भागांमध्ये दररोज कचरा संकलन करणे, नियमित साफसफाई करणे, सार्वजनिक ठिकाणी अतिरिक्त कचरापेट्या उपलब्ध करून देणे तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, शहरातील बाजारपेठ, शाळा, रुग्णालय परिसर आणि निवासी भागांमध्ये अस्वच्छतेचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळा तोंडावर असताना प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून शहर स्वच्छ व निरोगी ठेवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

या वेळी युवासेनेचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनावर मोठ्या संख्येने युवासेना पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून शहरातील स्वच्छता व्यवस्थेबाबत प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Previous Post

शेतरस्त्यांच्या प्रश्नावर शासनाला इशारा; ‘मिशन झिरो पेंडन्सी’ची मागणी

Next Post

सबजेलमध्ये दाखल करण्यापूर्वी पसार झालेला आरोपी यवत पोलिसांकडून जेरबंद

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
सबजेलमध्ये दाखल करण्यापूर्वी पसार झालेला आरोपी यवत पोलिसांकडून जेरबंद

सबजेलमध्ये दाखल करण्यापूर्वी पसार झालेला आरोपी यवत पोलिसांकडून जेरबंद

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In