• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चिंचपूर ढगे तीन दिवसांपासून अंधारात; वालवड सबस्टेशनचे काम पूर्ण होऊनही विजपुरवठा सुरू नाही

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
चिंचपूर ढगे तीन दिवसांपासून अंधारात; वालवड सबस्टेशनचे काम पूर्ण होऊनही विजपुरवठा सुरू नाही
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

भूम | प्रतिनिधी

भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे गाव गेल्या तीन दिवसांपासून अंधारात असून विजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे परिसरातील इतर गावांना सुरळीत वीजपुरवठा होत असताना चिंचपूर ढगे येथे वारंवार वीज खंडित होण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

चिंचपूर ढगे गावाचा वीजप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी गावाला वालवड येथील नव्याने उभारण्यात आलेल्या सबस्टेशनशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार गावासाठी आवश्यक ट्रान्सफॉर्मर बसविणे तसेच चिंचपूर ढगे ते वालवड दरम्यान वीजवाहिनी उभारण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र सर्व कामे पूर्ण होऊनही अद्याप गावाला वालवड सबस्टेशनवरून विजपुरवठा सुरू करण्यात आलेला नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

ग्रामस्थांनी महावितरणकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, या सबस्टेशनच्या कामावरून स्थानिक राजकीय स्तरावर श्रेयवादही रंगला होता. आमदार तानाजी सावंत आणि माजी आमदार राहुल मोटे यांच्या समर्थकांकडून या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात गावकऱ्यांना नियमित व अखंडित वीजपुरवठा मिळत नसल्याने श्रेयवादापेक्षा प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सध्या चिंचपूर ढगे, साडेसांगवी, गोलेगाव आणि नवलगाव या चार गावांचा वीजपुरवठा भूम सबस्टेशनअंतर्गत असलेल्या चिंचपूर फीडरवरून केला जातो. मात्र, विजपुरवठ्यात बिघाड झाल्यास अनेकदा केवळ चिंचपूर ढगे आणि साडेसांगवी ही गावे अंधारात ठेवली जातात, तर गोलेगाव आणि नवलगाव येथील पुरवठा सुरू ठेवला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गोलेगाव आणि नवलगावकडे जाणारी मुख्य वीजवाहिनी एबी स्विचच्या माध्यमातून स्वतंत्रपणे सुरू ठेवली जाते, तर चिंचपूर ढगे आणि साडेसांगवीचा वीजपुरवठा बंद ठेवला जातो. त्यामुळे या दोन गावांतील नागरिकांना वारंवार वीजटंचाईचा सामना करावा लागत असून दैनंदिन जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.

चिंचपूर ढगेसह परिसरातील गावांना तातडीने नियमित वीजपुरवठा सुरू करून वालवड सबस्टेशन कार्यान्वित करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Tags: Asif Shaikh
Previous Post

कळंबोलीत नव्याने बसवलेल्या पेव्हर ब्लॉकची दयनीय अवस्था; नागरिकांचा पैसा पाण्यात जात असल्याची टीका

Next Post

बहिरेवाडी नजीक भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
6
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
162
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
बहिरेवाडी नजीक भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू

बहिरेवाडी नजीक भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू

ताज्या बातम्या

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

September 10, 2026

लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य निवडीची उच्चस्तरीय चौकशी करा

September 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In