• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘व्यसनमुक्तीची वारी आली आपल्या दारी’ अभियानाचा अण्णा हजारे यांच्या हस्ते शुभारंभ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
‘व्यसनमुक्तीची वारी आली आपल्या दारी’ अभियानाचा अण्णा हजारे यांच्या हस्ते शुभारंभ
0
SHARES
231
VIEWS
Ad 1

शिरूर | प्रतिनिधी

भावी पिढीला व्यसनाच्या विळख्यातून मुक्त करून निरामय, तणावमुक्त आणि सुदृढ समाज घडविण्याच्या उद्देशाने राजर्षी शाहू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, दक्ष मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य आणि जागृत शोध वृत्तपत्र यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच शिरूर पोलीस ठाण्याच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या ‘व्यसनमुक्त आणि तणावमुक्त महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत ‘व्यसनमुक्तीची वारी आली आपल्या दारी’ या जनजागृती अभियानाचा शुभारंभ ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या हस्ते राळेगणसिद्धी येथे उत्साहात झाला.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

हे अभियान शिरूर तालुक्यातील गावागावांत पोहोचणार असून ग्रामीण भागातील नागरिकांकडून त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गावात जाऊन ग्रामस्थांना व्यसनमुक्तीची सामूहिक प्रतिज्ञा देण्यात येत आहे. तसेच आपत्कालीन मदतीसाठी असलेल्या डायल ११२ सेवेसह महिलांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या दामिनी पथकाच्या कार्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी डायल ११२ आणि दामिनी पथकाच्या कार्याची माहिती दिली, तर ग्रामीण रुग्णालय शिरूर (एनसीडी क्लिनिक) येथील समुपदेशक राजेश जाधव यांनी व्यसनमुक्तीचे महत्त्व विशद केले. अभियानाबाबतची सविस्तर माहिती संस्थेचे अध्यक्ष भगवान श्रीमंदिलकर यांनी दिली.

अभियानाची पंचसूत्री उद्दिष्टे

  • व्यसनाधीन व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे समुपदेशन करणे.
  • शाळा व महाविद्यालयांमध्ये व्यसनविरोधी आणि गुन्हेगारी प्रतिबंधक जनजागृती करणे.
  • आरोग्य, योग व मानसिक स्वास्थ्य शिबिरांचे आयोजन करणे.
  • व्यसनमुक्त व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे.
  • तरुणांना रोजगारक्षम बनवून चुकीच्या मार्गापासून परावृत्त करणे.

या अभियानात विविध शासकीय विभागांचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, ग्रामसखी, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, सामाजिक संस्था, महिला बचत गट, शिक्षक, पत्रकार आणि स्थानिक गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

अभियानात सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या अंगणवाडी सेविका, ग्रामसखी, आरोग्य कर्मचारी, सामाजिक संस्था आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा प्रतिष्ठानच्या वतीने विशेष सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येत आहे.

यावेळी राजर्षी शाहू प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भगवान श्रीमंदिलकर, शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, समुपदेशक राजेश जाधव, बाबुराव पाचंगे, मच्छिंद्र जामदार, अशोक पवार, नगरसेविका सविता राजापूरे, बळवंत कुंभार, विवेक जगदाळे, प्रकाश कुंभार, राणीताई कर्डीले, सविता बोरुडे, डॉ. वैशाली साखरे, रेश्मा शेख, अर्जुन बढे, अरुणकुमार मोटे, निलेश वाळुंज, बबन वाघमारे यांच्यासह पोलीस कर्मचारी, नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

व्यसनमुक्त, निरोगी आणि जागरूक महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने हे अभियान महत्त्वपूर्ण पाऊल ठरत असून, समाजातील सर्व घटकांनी यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Previous Post

शिरूरमधील अतिक्रमण कारवाईत दुजाभावाचा आरोप; कानोबा मंदिर परिसरातील अतिक्रमणांवर कारवाईची मागणी

Next Post

पाण्याच्या प्रत्येक थेंबातून वाहणार स्मृतींचा ओलावा; कै. निळकंठराव भारती यांना अनोखी श्रद्धांजली

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
161
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
पाण्याच्या प्रत्येक थेंबातून वाहणार स्मृतींचा ओलावा; कै. निळकंठराव भारती यांना अनोखी श्रद्धांजली

पाण्याच्या प्रत्येक थेंबातून वाहणार स्मृतींचा ओलावा; कै. निळकंठराव भारती यांना अनोखी श्रद्धांजली

ताज्या बातम्या

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

September 10, 2026

लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य निवडीची उच्चस्तरीय चौकशी करा

September 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In