• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिरूरमधील अतिक्रमण कारवाईत दुजाभावाचा आरोप; कानोबा मंदिर परिसरातील अतिक्रमणांवर कारवाईची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 7, 2026
in Blog
0
शिरूरमधील अतिक्रमण कारवाईत दुजाभावाचा आरोप; कानोबा मंदिर परिसरातील अतिक्रमणांवर कारवाईची मागणी
0
SHARES
366
VIEWS
Ad 1

शिरूर | प्रतिनिधी

शिरूर शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत दुजाभाव केला जात असल्याचा गंभीर आरोप लहुजी शक्ती सेनेचे युवक जिल्हाध्यक्ष विशाल उर्फ बंटी जोगदंड यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून शहरातील सर्व अतिक्रमणांवर समान व निष्पक्ष कारवाई करण्याची मागणी केली आहे.

RelatedPosts

श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वा निमित्त महाआरोग्य शिबिराचा हजारों रुग्णांनी घेतला लाभ

शेतकरी व सर्जा-राजाच्या अतूट बैल पोळा साजरा

रिठा तांडा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; गुणवंत शिक्षकांचा सन्मान

निवेदनानुसार, नगरपरिषदेकडून राबविण्यात येणाऱ्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान हातावर पोट असलेल्या नागरिकांवर, हातगाडी चालकांवर आणि लहान व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्यात आली. मात्र काही प्रभावशाली आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींच्या अतिक्रमणांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विशेषतः कानोबा मंदिर परिसरात अनेक वर्षांपासून विविध प्रकारची अतिक्रमणे अस्तित्वात असून, याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय, अतिक्रमण कारवाईबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे सर्वांवर समान निकषांवर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या नागरिकांशी दमदाटीची व अरेरावीची भाषा वापरण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. काही गरीब व आजारी नागरिकांनी आपल्या अडचणी मांडण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशीही असंवेदनशील वर्तन झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.

लोकशाही व्यवस्थेत प्रशासनाने सर्व नागरिकांशी समान व सन्मानपूर्वक वागणे अपेक्षित असताना अशा प्रकारच्या घटना दुर्दैवी असल्याचे मत विशाल उर्फ बंटी जोगदंड यांनी व्यक्त केले आहे.

निवेदनाद्वारे त्यांनी शिरूर शहरातील सर्व अतिक्रमणांवर कोणताही भेदभाव न करता समान निकषांवर कारवाई करावी, कानोबा मंदिर परिसरातील प्रलंबित अतिक्रमणे तातडीने हटवावीत तसेच नागरिकांशी अयोग्य वर्तन करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

यावेळी बोलताना विशाल उर्फ बंटी जोगदंड म्हणाले, “शिरूर शहरातील अतिक्रमण कारवाई पारदर्शक, निष्पक्ष आणि सर्वांसाठी समान असली पाहिजे. गरीबांवर कठोर कारवाई आणि प्रभावशालींना मोकळीक देण्याची भूमिका नागरिकांच्या न्यायभावनेला धक्का देणारी आहे. प्रशासनाने कोणताही भेदभाव न करता कायद्याची समान अंमलबजावणी करावी.”

Previous Post

पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची वरवटी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे गोशाळेला भेट; सेंद्रिय शेती व आयुर्वेदिक उत्पादन उपक्रमांचे उद्घाटन

Next Post

‘व्यसनमुक्तीची वारी आली आपल्या दारी’ अभियानाचा अण्णा हजारे यांच्या हस्ते शुभारंभ

Related Posts

श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वा निमित्त महाआरोग्य शिबिराचा हजारों रुग्णांनी घेतला लाभ
Blog

श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वा निमित्त महाआरोग्य शिबिराचा हजारों रुग्णांनी घेतला लाभ

September 12, 2026
28
Blog

शेतकरी व सर्जा-राजाच्या अतूट बैल पोळा साजरा

September 12, 2026
11
रिठा तांडा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; गुणवंत शिक्षकांचा सन्मान
Blog

रिठा तांडा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; गुणवंत शिक्षकांचा सन्मान

September 12, 2026
17
मारेगाव पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यावर धडक कारवाई,……….
Blog

मारेगाव पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यावर धडक कारवाई,……….

September 12, 2026
55
Blog

अंगणवाडी गुणवत्ता यादीवर आक्षेप; ४ अतिरिक्त गुणांची चौकशी करण्याची मागणी

September 12, 2026
48
Blog

गायनातून कोणत्याही प्रकारचा इन्कम घेतला असाल तर अश्या व्यक्तींना सहभाग घेता येणार नाही.

September 12, 2026
7
Next Post
‘व्यसनमुक्तीची वारी आली आपल्या दारी’ अभियानाचा अण्णा हजारे यांच्या हस्ते शुभारंभ

‘व्यसनमुक्तीची वारी आली आपल्या दारी’ अभियानाचा अण्णा हजारे यांच्या हस्ते शुभारंभ

ताज्या बातम्या

श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वा निमित्त महाआरोग्य शिबिराचा हजारों रुग्णांनी घेतला लाभ

श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वा निमित्त महाआरोग्य शिबिराचा हजारों रुग्णांनी घेतला लाभ

September 12, 2026

शेतकरी व सर्जा-राजाच्या अतूट बैल पोळा साजरा

September 12, 2026
रिठा तांडा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; गुणवंत शिक्षकांचा सन्मान

रिठा तांडा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; गुणवंत शिक्षकांचा सन्मान

September 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In