• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीम; वर्ध्यात २० गुन्हे दाखल, १० आरोपी अटकेत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीम; वर्ध्यात २० गुन्हे दाखल, १० आरोपी अटकेत
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

वर्धा | प्रतिनिधी

पुणे येथे घडलेल्या विषारी दारूकांडात अनेकांना जीव गमवावा लागल्यानंतर राज्यभर अवैध मद्यनिर्मिती आणि विक्रीविरोधात कारवाई तीव्र करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी संपूर्ण राज्यात अवैध गावठी दारू व बनावट मद्यनिर्मितीचा पूर्णपणे बंदोबस्त करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

या आदेशानुसार विभागीय उपआयुक्त गणेश पाटील (नागपूर विभाग) तसेच वर्धा जिल्ह्याचे अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने वर्धा जिल्ह्यात धडक मोहीम राबविली आहे.

दिनांक २९ मे २०२६ पासून सुरू असलेल्या या विशेष मोहिमेदरम्यान गावठी दारू निर्मिती, विक्री, वाहतूक तसेच बनावट मद्यनिर्मितीविरोधात व्यापक कारवाई करण्यात आली. भरारी पथकाचे निरीक्षक एम. ए. शेख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आतापर्यंत एकूण २० गुन्हे नोंदविले असून १० आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या कारवाईत अवैध दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे १०,१८० लिटर रसायन, ८ लिटर विदेशी मद्य आणि १९२ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ४ लाख ३५ हजार १५२ रुपये असल्याची माहिती विभागाने दिली.

या मोहिमेत दुय्यम निरीक्षक डी. वाय. राऊत, आर. यू. काष्टे तसेच जवान अमित नागमोते, योगेश गावंडे, गिरीष बावणे आणि सुजाता भारस्करे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

दरम्यान, जिल्ह्यात कुठेही अवैध दारू निर्मिती, विक्री किंवा वाहतुकीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी तत्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळवावे, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

अवैध मद्य व्यवसायाविरोधातील ही मोहीम पुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे.

Previous Post

जय विनायक बिल्डक्रॉप व जेएसव्ही डेव्हलपर्स प्रकरणातील ६३० गुंतवणूकदारांना दिलासा; २२ कोटींच्या मालमत्ता जप्त

Next Post

रामनगर पोलिसांची दारूबंदी अंतर्गत धडक कारवाई; तिघांना अटक, २७ हजारांहून अधिकांचा मुद्देमाल जप्त

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
161
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
रामनगर पोलिसांची दारूबंदी अंतर्गत धडक कारवाई; तिघांना अटक, २७ हजारांहून अधिकांचा मुद्देमाल जप्त

रामनगर पोलिसांची दारूबंदी अंतर्गत धडक कारवाई; तिघांना अटक, २७ हजारांहून अधिकांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

September 10, 2026

लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य निवडीची उच्चस्तरीय चौकशी करा

September 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In