• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बसवराज पाटलांना दगा-फटक्याची भीती? सोशल मीडियावरील संदेशाने राजकीय वर्तुळात चर्चा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
बसवराज पाटलांना दगा-फटक्याची भीती? सोशल मीडियावरील संदेशाने राजकीय वर्तुळात चर्चा
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

धाराशिव | प्रतिनिधी

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकांना अवघे काही दिवस शिल्लक असताना धाराशिव-लातूर-बीड मतदारसंघातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेले बसवराज पाटील हे आता पक्षांतर्गत राजकारणामुळे चर्चेत आले असून, त्यांनी अप्रत्यक्षपणे पक्षातील काही स्थानिक नेत्यांकडून दगा-फटका होण्याची शक्यता व्यक्त केल्याची चर्चा रंगली आहे.

RelatedPosts

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

सोशल मीडियावर सध्या एक संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या संदेशामध्ये बसवराज पाटील, त्यांचे बंधू व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील आणि सुपुत्र शरण पाटील यांचे छायाचित्र वापरण्यात आले असून, “सगळी सूत्रे इथूनच हलतात” असा सूचक उल्लेख करण्यात आला आहे. या संदेशामुळे भाजपच्या स्थानिक राजकारणात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

धाराशिव जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक बांधणी करण्यात माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे मोठे योगदान मानले जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा विस्तार झाला आणि २०१६ मध्ये त्यांना विधान परिषदेवर संधीही मिळाली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी जिल्हाध्यक्षपदापर्यंत मजल मारली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी ठाकूर किंवा कुलकर्णी यांपैकी कोणाला तरी उमेदवारी मिळेल, अशी कार्यकर्त्यांमध्ये अपेक्षा होती.

मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही तासांपूर्वी भाजपने लातूर ग्रामीणचे अध्यक्ष बसवराज माधवराव पाटील (मुरूमकर) यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर १ जून रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या नेत्यांनी बसवराज पाटील हे राज्यातील सर्वाधिक मतांनी निवडून येणारे उमेदवार ठरतील, असा विश्वास व्यक्त केला होता.

दरम्यान, बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवर विविध स्तरांतून टीका होत असल्याने ते अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे त्यांच्या तालुक्यातील काँग्रेसचे युवा नेते व जिल्हा परिषद सदस्य महेश देशमुख हे देखील निवडणुकीच्या रिंगणात असल्याने सामना अधिक चुरशीचा होण्याची शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील संदेशातून व्यक्त करण्यात आलेल्या सूचक इशाऱ्यामुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद आणि संभाव्य गटबाजीबाबत चर्चांना अधिक उधाण आले आहे. मात्र या संदेशाबाबत किंवा दगा-फटक्याच्या चर्चेबाबत पक्षाच्या कोणत्याही अधिकृत नेत्याने अद्याप भाष्य केलेले नाही.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांत या राजकीय घडामोडींना अधिक वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Tags: Ladlesab Nadaf
Previous Post

मुख्य जलवाहिनी फुटल्याने रिसोडचा पाणीपुरवठा विस्कळीत; दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर

Next Post

उमरगा : स्वच्छतेच्या घोषणांपासून घाणीच्या साम्राज्याकडे?

Related Posts

ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
65
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
1
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
0
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
1
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
1
ताज्या घडामोडी

सप्तश्रृंगीगड–नांदुरी मार्ग १७ दिवस वाहतुकीसाठी बंद

September 10, 2026
5
Next Post
उमरगा : स्वच्छतेच्या घोषणांपासून घाणीच्या साम्राज्याकडे?

उमरगा : स्वच्छतेच्या घोषणांपासून घाणीच्या साम्राज्याकडे?

ताज्या बातम्या

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In